लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील एमआयटी कॉर्नरवर शुक्रवारी (ता. 19) दुचाकी इंडीकावर आदळुन झालेल्या अपघातातात गंभीर जखमी झालेल्या अथर्व तुषार साळुंखे (वय- १७, रा. पठारेवस्ती, लोणी स्टेशन) या युवकाचा पाच दिवसानंतर उपचारादरम्यान आज (मंगळवारी) बारा वाजनेच्या सुमारास मृत्यु झाला.
अथर्व साळुंखे याचा शुक्रवारी एमआयटी कॉर्नरवर अपघात झाला होता. यात अथर्व गंभीर जखमी झाल्याने, त्याच्यावर पुण्यातील एका बड्या रुग्नालयात उपचार चालु होते. मात्र आज (मंगळवारी) उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. अथर्व हा लोणी काळभोर (स्टेशन) परीसरातील नामांकित प्रिटींग व्यावसायिक तुषार साळुंखे यांचा मुलगा आहे. अथर्वच्या जाण्याने लोणी स्टेशन हद्दीतील पठारे वस्ती परीसरावर दुखःचे सावट पसरले आहे.
दरम्यान पुणे-सोलापुर महामार्गावर शुक्रवारी सकाळी अथर्व साळुंखे हा लोणी स्टेशनहुन माळीमळा बाजुकडे दुचाकीवरुन भऱधाव वेगात निघाला होता. अथर्व एमआयटी कॉर्नरवर आला असता, त्याचवेळी एक इंडीका चारचाकी गाडी हि एमआयटीकडून पुणे-सोलापुर मार्गावर येत होती. तर दुसरीकडे एक लाल रंगाचे चारचाकी वाहन उरुळी कांचनकडे जात होते. अथर्वला इंडीका वर येत असल्याचे दिसले मात्र त्याचवेळी लाल रंगाच्या वहानाने अथर्वला हुलकावणी दिल्याने, अथर्व इंडीकावर जाऊन आदळला. यात इंडीकावरुन उडुन तो रस्त्याच्या दुभाजाकवरही जाऊन आदळला. यात त्याला मोठा मार लागल्याने, त्याची अवस्था अतिशय गंभीर झाली. सुरुवातीला त्याच्यावर लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार चालु होते. मात्र त्याच्या प्रकृतीत फारसा फरक पडत नसल्याने, अथर्वच्या नातेवाईकांनी अथर्वला पुण्यातील बड्या रुग्नालयात उपचारासाठी हलविले होते. मात्र त्या ठिकाणी उपचार चालु असताना, त्याचा मृत्यु झाला.
पाच दिवसात तीन शाळंकरी मुलांचे मृत्यु, किती बळीनंतर प्रशासन झोपेतुन उठणार…
पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी स्टेशन परीसरात मागिल पाच दिवसाच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या अपघातात, अथर्वसह गायत्री शितोळे व राजश्री शितोळे या दोन सख्ख्या बहिणी अशा तीन शाळकरी मुला-मुलींचे अपघातात मृत्यु झालेले आहेत. गायत्री शितोळे व राजश्री शितोळे या दोन सख्ख्या बहिणींच्या अपघाती मृत्युनंतर लोणी काळभोर पोलिसांची वहातुक शाखा व या शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक साळुंके व नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या टिकेची झोड उठवली जात आहे.
मात्र कवडीपाट ते उरुळी कांचन या दरम्यान अपघात टाळण्यासंदर्भात प्रशसाकडुन कोणत्याही प्रकारच्या हालचाली होत नसल्याचे दिसुन येत आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे वरीष्ठ अधिकाऱ्यांना सुचना देऊही, एकही अधिकारी अद्याप घटनास्थळी फिरकलेला नाही. यामुळे लोणी काळभोर पोलिसांची वहातुक शाखा व नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बाबत प्रचंड नाराजी आहे. मागिल पाच दिवसात तीन बळी गेले आहेत. आनखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार असा प्रश्न नागरीक विचारत आहेत.