Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरीवाडीतील दिंडोरे खून प्रकरण ; सोलापूर सत्र न्यायालयाचे चार आरोपींना जन्मठेप ठोठविली तर आठ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 August 2022, 13:17

सोलापूर- शेतजमिनीच्या वाटणीच्या वादामध्ये विरोधात भूमिका घेतल्याने चुलत भावावर बंदुकीने गोळी झाडून त्याचा खून केल्याबद्दल तीन सख्या भावांसह चौघा आरोपींना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच मृताच्या चार वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रूपयांप्रमाणे आठ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी या खटल्याचा निकाल सुनावला आहे.

बशरणप्पा दिंडोरे, त्याचे वडील शिवानंद दिंडोरे, बसवराज महादेव दिंडोरे आणि सिध्दाराम दिंडोरे अशी शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आहेरवाडी येथील मृत मल्लिकार्जुन दिंडोरे यांची बहीण भागिरथी आणि आरोपी शरणप्पा आणि इतरांमध्ये शेतजमिनीचा वाटणीचा वाद होता.बहिण भागिरथी हिच्या हिश्याला येणारी शेतजमीन देण्यास आरोपी टाळाटाळ करीत होते.

तेव्हा या वादात मृत मल्लिकार्जुन दिंडोरे यांनी बहिणीच्या बाजूने हस्तक्षेप करून वाद मिटविला होता.परंतु हा वाद आमच्या परस्पर का मिटविला, असा सवाल करीत आरोपींनी मृत मल्लिकार्जुन यांच्याशी वाद घातला.१९ मार्च २०१७ रोजी मृत मल्लिकार्जुन दिंडोरे हे आपल्या वस्तीवर आपले बंधू मधुकर आणि इतरांशी गप्पा मारत थांबले होते.तेव्हा आरोपी शरणप्पा दिंडोरे हा त्याचे वडील आणि चुलत्यांसह दुचाकीने तेथे आला.

 

त्याने शेतजमिनीच्या वाटणीचा वाद आमच्या परस्पर कसा मिटविला, याचा जाब विचारत भांडण काढले आणि सोबत आणलेल्या बंदुकीने मल्लिकार्जुन यांच्यावर गोळी झाडली.बंदुकीची गोळी त्यांच्या डोक्यात कवटीत शिरल्यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, वळसंग पोलिसांनी तपासाअंती आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.त्याचा आज निकाल लागल्याने तब्बल ४ वर्षाने न्याय मिळाला आहे. आणि आरोपींना सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच मृताच्या चार वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रूपयांप्रमाणे आठ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

लोणी काळभोर हद्दीतील एमआयटी कॉर्नरवर पाच दिवसापुर्वी झालेल्या अपघातामधील सतरा वर्षीय अथर्व साळुंखे याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यु ; मागिल पाच दिवसात लोणी स्टेशन परीसरात अपघातात तब्बल तीन अल्पवयीन मुलां-मुलींचे मृत्यु...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.