Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर हद्दीतील एमआयटी कॉर्नरवर पाच दिवसापुर्वी झालेल्या अपघातामधील सतरा वर्षीय अथर्व साळुंखे याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यु ; मागिल पाच दिवसात लोणी स्टेशन परीसरात अपघातात तब्बल तीन अल्पवयीन मुलां-मुलींचे मृत्यु…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 August 2022, 13:55

लोणी काळभोर (पुणे) :  पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील एमआयटी कॉर्नरवर शुक्रवारी (ता. 19) दुचाकी इंडीकावर आदळुन झालेल्या अपघातातात गंभीर जखमी झालेल्या अथर्व तुषार साळुंखे (वय- १७, रा. पठारेवस्ती, लोणी स्टेशन) या युवकाचा पाच दिवसानंतर उपचारादरम्यान आज (मंगळवारी) बारा वाजनेच्या सुमारास मृत्यु झाला.

अथर्व साळुंखे याचा शुक्रवारी एमआयटी कॉर्नरवर अपघात झाला होता. यात अथर्व गंभीर जखमी झाल्याने, त्याच्यावर पुण्यातील एका बड्या रुग्नालयात उपचार चालु होते. मात्र आज (मंगळवारी) उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. अथर्व हा लोणी काळभोर (स्टेशन) परीसरातील नामांकित प्रिटींग व्यावसायिक तुषार साळुंखे यांचा मुलगा आहे. अथर्वच्या जाण्याने लोणी स्टेशन हद्दीतील पठारे वस्ती परीसरावर दुखःचे सावट पसरले आहे.

दरम्यान पुणे-सोलापुर महामार्गावर शुक्रवारी सकाळी अथर्व साळुंखे हा लोणी स्टेशनहुन माळीमळा बाजुकडे दुचाकीवरुन भऱधाव वेगात निघाला होता. अथर्व एमआयटी कॉर्नरवर आला असता, त्याचवेळी एक इंडीका चारचाकी गाडी हि एमआयटीकडून पुणे-सोलापुर मार्गावर येत होती. तर दुसरीकडे एक लाल रंगाचे चारचाकी वाहन उरुळी कांचनकडे जात होते. अथर्वला इंडीका वर येत असल्याचे दिसले मात्र त्याचवेळी लाल रंगाच्या वहानाने अथर्वला हुलकावणी दिल्याने, अथर्व इंडीकावर जाऊन आदळला. यात इंडीकावरुन उडुन तो रस्त्याच्या दुभाजाकवरही जाऊन आदळला. यात त्याला मोठा मार लागल्याने, त्याची अवस्था अतिशय गंभीर झाली. सुरुवातीला त्याच्यावर लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार चालु होते. मात्र त्याच्या प्रकृतीत फारसा फरक पडत नसल्याने, अथर्वच्या नातेवाईकांनी अथर्वला पुण्यातील बड्या रुग्नालयात उपचारासाठी हलविले होते. मात्र त्या ठिकाणी उपचार चालु असताना, त्याचा मृत्यु झाला.

 

पाच दिवसात तीन शाळंकरी मुलांचे मृत्यु, किती बळीनंतर प्रशासन झोपेतुन उठणार…

पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी स्टेशन परीसरात मागिल पाच दिवसाच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या अपघातात, अथर्वसह गायत्री शितोळे व राजश्री शितोळे या दोन सख्ख्या बहिणी अशा तीन शाळकरी मुला-मुलींचे अपघातात मृत्यु झालेले आहेत. गायत्री शितोळे व राजश्री शितोळे या दोन सख्ख्या बहिणींच्या अपघाती मृत्युनंतर लोणी काळभोर पोलिसांची वहातुक शाखा व या शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक साळुंके व नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या टिकेची झोड उठवली जात आहे.

मात्र कवडीपाट ते उरुळी कांचन या दरम्यान अपघात टाळण्यासंदर्भात प्रशसाकडुन कोणत्याही प्रकारच्या हालचाली होत नसल्याचे दिसुन येत आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे वरीष्ठ अधिकाऱ्यांना सुचना देऊही, एकही अधिकारी अद्याप घटनास्थळी फिरकलेला नाही. यामुळे लोणी काळभोर पोलिसांची वहातुक शाखा व नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बाबत प्रचंड नाराजी आहे. मागिल पाच दिवसात तीन बळी गेले आहेत. आनखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार असा प्रश्न नागरीक विचारत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

वाहतूक पोलीसांसमोरूनच थेऊर - लोणीकंद रस्त्यावर जड वाहतूक सुरूच ; वाहतूक पूर्णतः बंद करून कारवाई करण्याची मागणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.