Shirur News : (पुणे) बेकायदेशीर तसेच विनापरवाना कोयता जवळ बाळगून त्याचा व्हिडिओ बनवुन तो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून सोशल मीडियावरुन गावामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Shirur News)
दोघांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
रोहित महादेव हरिहर (वय -२८), सिध्देश संतोष वेताळ (वय – १९ रा. दोघेही आलेगाव पागा, ता. शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सदर हत्यार जप्त केले आहे. याबाबत शिरूर पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार नितेश थोरात यांनी शिरुर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.(Shirur News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २२) तीन वाजण्याच्या सुमारास आलेगाव पागा (ता. शिरुर) येथील रोहित महादेव हरिहर आणि सिध्देश संतोष वेताळ या दोन युवकांनी बेकायदेशीर विनापरवाना कोयता जवळ बाळगून मंदिरामध्ये जावुन त्याची पुजा केली. पूजा करतानाचा व्हिडीओ बनवुन तो व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करुन सोशल मीडियावरुन गावामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याची माहिती एका खबऱ्यामार्फत शिरुर पोलिसांना मिळाली.(Shirur News)
पोलिसांनी तातडीने हालचाल करत दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली. तसेच त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक लोखंडी कोयता बेकायदेशीरीत्या विनापरवाना जवळ बाळगल्याचे आढळून आले.(Shirur News)
सदरची कारवाई शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, अभिजित पवार, पोलीस अंमलदार विनोद मोरे, सचिन भोई, राजेंद्र गोपाळे यांनी केली आहे.