Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सशस्त्र दरोडा…! धारदार शस्त्राने हल्ला करून दाम्पत्याला लुटले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड पळविली

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 November 2024, 17:07

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील शिंदे मळा परिसरात चार ते पाच दरोडेखोरानी धारदार शस्त्राने हल्ला करून दाम्पत्याला गंभीर जखमी केले आहे. दरोडेखोरांनी घरातील दीड तोळ्यांचे सोन्याचे दागिने, १० हजार रुपयांची रोकड घेऊन फरार झाल्यची घटना घडली आहे. या घटनेत राजेंद्र विश्वनाथ लगड, गीता राजेंद्र लगड हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी राजेंद्र लगड यांनी वेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र लगड हे आपल्या कुटुंबासोबत घरात झोपलेले असताना रविवारी पहाटे चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी घराचा आतून लावलेला दरवाजा कटावणीच्या साह्याने उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी लगड यांनी दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी धारदार शास्त्राने लगड यांच्यावर वार करत घरात प्रवेश केला. घरातील मौल्यवान ऐवज कुठे ठेवला आहे, असे विचारत दोघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

घाबरलेल्या गीता लगड यांनी गळ्यातील तसेच कानातील सोन्याचे दागिने काढून दिले. मात्र, यावेळी एका कानातले निघत नसल्याने चोरट्यांनी त्यांच्या कानातील ओरबाडून काढले. तसेच राजेंद्र लगड यांच्या पेंटच्या खिशात असलेले दहा हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. माधारी जाताना चोरट्यांनी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करत इतर खोल्यांकडे मोर्चा वळवला. त्यावेळी राजेंद्र लगड यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केल्याने दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.

दरम्यान, आरडाओरडा झाल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी राजेंद्र लगड आणि गीता लगड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून तपास करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
Aditya Thackeray elected Shiv Sena (UBT)'s legislative party leader

मोठी बातमी : आदित्य ठाकरे यांची सभागृह नेतेपदी निवड, भास्कर जाधवांकडे गटनेते पद; सुनील प्रभू प्रतोद म्हणून कायम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.