पुणे : भारताने झिम्बाब्वेविरूद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यामध्ये रोमहर्षक विजय मिळवला आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत ३-० ने मालिका जिंकली. या सामन्यामध्ये शुभमन गिल हा हिरो ठरला आहे. शतक ठोकत सामन्यामध्ये मोक्याच्याक्षणी अफलातून झेल त्याने घेतला.
झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने झुंजार ११५ धावांची शतकी खेळी करत भारताचे टेन्शन वाढवले होते. मात्र अखेर भारताने शेवटच्या षटकापर्यंत गेलेला सामना १३ धावांनी जिंकत मालिका ३-० अशी खिशात टाकली.
Sikandar Raza in the last 6 ODI’s for Zimbabwe:
135*(109) vs BAN while chasing 304
117*(127) vs BAN while chasing 291
115(95) vs IND while chasing 290 pic.twitter.com/1uzLpBPpKX— Johns. (@CricCrazyJohns) August 22, 2022
भारताने प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघासमोर २८९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. यामध्ये गिलने अवघ्या ९७ चेंडूंमध्ये १३० धावांची शानदार खेळी केली. यामध्ये त्याने खणखणीत १५ चौकार आणि १ षटकार खेचला. त्यासोबतच इशान किशनने अर्धशतकी खेळी करत धावसंख्या वाढवण्यात हातभार दिला.
झिम्बाब्वेसोबतच सामना अंतिम षटकापर्यंत गेला होता. सिकंदर रझाने एक बाजू लावून धरली होती. सामना पलटतो की अशी स्थिती झाली होती. शार्दुल ठाकुरच्या ४९ व्या षटकात चौथ्या चेंडूवर रझाने जोरात फटका मारला होता. शुभमन गिल सीमारेषेजवळ होता त्याने चेंडूचा अंदाज घेतला मात्र चेंडू पुढे राहिला त्यावेळी हवेत झेप घेत गिलने चेंडू पकडला. सिकंदर ११५ धावांवर बाद झाला. मात्र झिम्बाब्वेला ४९.३ षटकात सर्वाबाद २७६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
दरम्यान, गिलच्या या सुपरमॅन कॅचनंतर सामना पुर्णपणे भारताच्या बाजुने झुकला. अखेरच्या षटकात आवेश खानने यॉर्कर टाकत शेवटचा गडी बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.