Pimpari Crime : (पुणे) : पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्यावेळी दुचाकीस्वार बसखाली चिरडला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात सोमवारी (ता. १७) पहाटे अडीच वाजता पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर घडला.(Pimpari Crime)
बसचालकाविरोधात गुन्हा दाखल.
अशोक वारके (वय ५४, रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा उमाकांत अशोक वारके यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pimpari Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील सोमवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गाने दुचाकीवरून जात होते. लांडगे नाट्यगृहासमोर आल्यावर त्यांच्या दुचाकीला बसने पाठीमागून धडक दिली. त्यात अशोक रस्त्यावर पडले. त्यानंतर त्यांच्या अंगावरून बस गेली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.(Pimpari Crime)
अशोक वारके (वय ५४, रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा उमाकांत अशोक वारके यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pimpari Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील सोमवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गाने दुचाकीवरून जात होते. लांडगे नाट्यगृहासमोर आल्यावर त्यांच्या दुचाकीला बसने पाठीमागून धडक दिली. त्यात अशोक रस्त्यावर पडले. त्यानंतर त्यांच्या अंगावरून बस गेली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.