दीपक खिलारे Indapur News : इंदापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ च्या पावसाळी पुरवणीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल २९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (ता.१७) दिली.(Indapur News)
२९ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
शिवसेना-भाजप महा युती सरकारच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी रस्ते व इतर विकास कामासाठी भरघोस निधी आण्यासाठी आंम्ही सतत प्रयत्नशील आहोत. असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.(Indapur News)
तसेच सदर निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.(Indapur News)
मंजूर झालेले ६ रस्ते पुढीलप्रमाणे –
(कंसात मंजूर निधी रक्कम)
१) बावडा (रा.मा.१२०) ते निरनिमगाव जिल्हा हद्दीपर्यंत इ.जि.मा. २१३ ची सुधारणा करणे (९ कोटी),
२) बावडा (प्र.जि.मा. ८६) काकडे वस्ती-शेटे वस्ती ते सावंत वस्ती बावडा ग्रा.मा.२०० रस्ता करणे-(४ कोटी),
३) टणु रा.मा.१२० ते टणू (चव्हाण वस्ती) बंधारा ते गावठाण ग्रा.मा. २०२ रस्ता सुधारणा करणे – (४ कोटी),
४) वालचंनगर- सराफवाडी- रेडा- शहाजीनगर -भोडणी ते राज्यमार्ग 125 रस्ता रुंदीकरण करणे प्र.जि. मार्ग १२६ कि.मी.१८/०० ते २३/०० सुधारणा करणे- (४ कोटी),
५) सणसर राज्य मार्ग १२१ ते रायते मळा, खटके वस्ती ते सणसर रा.मा. १२० सुधारणा करणे ग्रा. मा. २६६- (४ कोटी),
६) वकीलवस्ती रा.मा.१२५ ते भांडगाव (प्र.जि. मार्ग ८६ पर्यंत) रस्ता करणे ग्रा.मा.७७ – (४ कोटी).(Indapur News)