Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या बलात्काराच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पिडीत मुलीच्या कुटुंबीयांची सोमवारी (ता. १७) भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी आपल्या व्यथा मांडताना कुटुंबीयांचे अश्रू आनावर झाले होते. तर भारतीय जनता पार्टी आपल्या कुटुंबीयांचे पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचे आश्वासन गणेश भेगडे यांनी यावेळी कुटुंबियांना दिले. Uruli Kanchan News
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत कोयत्याचा धाक दाखवून आई – वडिलांना जीवे मरण्याची धमकी देत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी मागिल पंधरा दिवसांपासून वारंवार बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (ता. १३) सकाळी उघडकीस आली होती. या घटनेने संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. Uruli Kanchan News
सोमवारी (ता. १७) प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे हे हवेली तालुक्यातील एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी यावेळी कुटुंबीयांची भेट घेतली. व कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी व्यापार आघाडी भाजपा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास जगताप, दादासाहेब सातव, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर, सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, शहराध्यक्ष अमित कांचन, पूजा सणस, खुशाल कुंजीर, आबासाहेब चव्हाण, रेखा तुपे, शारदा गोगावले, साक्षी खोमणे, साक्षी ढवळे, करण सणस आदी उपस्थित होते.
यावेळेस पत्रकारांनी संवाद साधताना गणेश भेगडे म्हणाले की, उरुळी कांचन येथील घटना ही दुर्दैवी असून एक पक्ष म्हणून आम्ही सर्वजण या कुटुंबीयांचे पाठिशी उभे आहोत. तसेच त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्याचे काम सातत्याने करण्यात येईल. पोलीस प्रशासनाने दोन्ही गुन्हेगारांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र दोन्ही गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे. तसेच हि केस फास्ट ट्रेकवर चालवावी, लवकरात लवकर या केसचा निकाल लावून दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
अमित कांचन व पूजा सणस दोघांचे विशेष कौतुक..
उरुळी कांचन येथील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमित कांचन व जिल्हा युवती आघाडी उपाध्यक्ष पूजा सणस व अक्षय कांचन यांनी या घटनेत तत्परता दाखवली. घडलेला प्रकार खूप निंदनीय होता. या घटनेचा निषेध करीत या परिवाराला न्याय मिळावा या अनुषंगाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा विषय घेतला. त्या ठिकाणाचा कोणत्याही प्रकारचा दबाब न घेता परिवाराला आत्मविश्वासात घेऊन व इतर होणाऱ्या कुटुंबीयावरचा अन्याय दूर होईल असे सांगत मोठी तत्परता अमित कांचन व पूजा सणस यांनी दाखविली त्यांचे कौतुक भेगडे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केले. Uruli Kanchan News