Pune News : उत्तमनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाचा बंगला फोडून चोरट्यांनी २९ लाखांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.(Pune News)
अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल.
याप्रकरणी अक्षय सुरेश नाणेकर (वय 30, रा. जयश्री निवास, न्यू कोपरे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय नाणेकर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या पत्नीच्या बहिणीचे लग्न असल्याने त्या पाषाणला माहेरी गेल्या होत्या. नाणेकर हे रविवारी (ता.९) रात्री १२ वाजता घराला कुलूप लावून मित्राला भेटण्यासाठी डोणजे येथे गेले होते.(Pune News)
दरम्यान, नाणेकर हे तेथून पहाटे सव्वा दोन वाजता घरी परत आले. तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला आढळून आला. त्यांनी घरात जाऊन पहिले असता, घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवेलेले ३१ तोळे सोन्याचे दागिने, १२ लाख रुपयांची रोकड, मोबाईल, लॅपटॉप असा २९ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन गेल्याचे निदर्शनास आले.(Pune News)