गणेश सुळ
Daund News : केडगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेतला असून, दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विकासकामांना प्राधान्य देणार आहे. मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील राजकारणात मागील आठवड्यात मोठा भूकंप झाला. यामुळे संपूर्ण राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली आहेत. यानंतर दौंड तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. तो दूर करण्यासाठी तुषार थोरात यांनी खुटबाव येथे पत्रकार परिषद बोलावून कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही
यावेळी ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेतला असून, दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विकासकामांना प्राधान्य देणार आहे. (Daund News) सर्व तालुक्याच्या विकासासाठी विविध योजना तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी ‘नेतेमंडळी जोमात तर कार्यकर्ते कोमात’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन तुषार थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिले.
रमेश थोरात यांनी कार्यकर्त्यांना, पदाधिकारी यांना सोबत घेऊन तालुक्याचा दौरा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती देखील तुषार थोरात यांनी दिली आहे. (Daund News) अजित पवार व रमेश थोरात यांचे घनिष्ठ संबंध असल्याने अजित पवार हे रमेश थोरात यांचा शब्द कशीही डावलत नाही, याची संपूर्ण जिल्ह्यात ख्याती आहे. यासर्वांमुळेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आशिया खंडात टॉपला नेण्याचे काम रमेश थोरात यांच्या हातून झाले.
तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. (Daund News) आत्ता सर्वसामान्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातील, कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही.
अजित पवार व रमेश थोरात तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन मार्गदर्शनाखाली सामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून दौंड तालुक्याच्या विकासाला गती देणार असल्याचे तुषार थोरात यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : नाथाचीवाडी येथील मंजूर असलेल्या ७० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन