Pune News : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला शनिवारपासून सुरूवात झाली.त्यांनी येवला येथून रणशिंग फुंकले. आजपासून (रविवार) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. आज सकाळीच मुंबईहून ते विदर्भात रवाना झालेय उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथे पत्रकार परिषद झाली.
उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू
ठाकरेंच्या या दौऱ्यातून शिंदे गटात गेलेले आमदार संजय राठोड यांना ठाकरे गटाकडून आव्हान दिले जाणार आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी संवाद साधणार आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या फुटीवर काय भाष्य करतात, याकडे सगळ्याचे लक्ष आहे.
“राज्यात आघाडीचे सरकार असताना अजित पवार व राष्ट्रवादीने आमच्यावर अन्याय केला. म्हणून आम्ही मविआतून बाहेर पडलो, असे शिंदे गट सांगत होता. (Pune News) आता त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीच्या मांडी लावून ते पुन्हा सत्तेत बसले आहेत. यावरुन शिंदे गटाचे ढोंग आता उघडे पडले आहे,” असे ठाकरे म्हणाले.
“मागे महाविकास आघाडीच्या ज्या काही सभा झाल्या, त्यादरम्यान येथे सभा झाली नाही, यानिमित्ताने हा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा आहे,गेल्या अनेक दिवसांपासून पोहरादेवीचे दर्शन घेण्याची इच्छा होती,” असे ठाकरे म्हणाले.
“सध्या अनेकांना मुख्यमंत्री बनण्याची हौस आहे. मात्र, सत्तेच्या या साठमारीत सामान्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. (Pune News) त्या रोखण्यासाठी काही पाऊले उचलणार आहात की नाही?,” असा सवाल ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केला.
अजितदादांबाबत एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेले नाही.(Pune News) त्यामुळे शिवसेनेच्या बंडानंतर अनेक जण मला सांगत आहे की, उद्धवजी आम्ही तुमच्यासोबत आहे. कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे, हे समजून घेण्यासाठी मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे,”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कोयता गँगच्या मुसक्या आवळणार; पोलिसांचा मोठा निर्णय