Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : किशोर आवारे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार भानू खळदेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या – पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे यांची माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 July 2023, 14:59

Pimpri News : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर पिस्तूलने गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला माजी नगरसेवक भानू खळदे हा फरार होता. अखेर पोलिसांनी भानू खळदेला नाशिक येथून सापळा रचून मोठ्या शिताफीने शनिवारी (ता.८) पहाटेच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. अशी माहिती पिंपरी चिंचवडच्या पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली आहे.(Pimpri News)

मुख्य संशयित असलेला माजी नगरसेवक भानू खळदे हा फरार.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे आणि चंद्रभान खळदे यांनी एकत्रित येत तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समिती ही स्थानिक राजकीय आघाडी स्थापन केली होती. त्या माध्यमातून खळदे यांच्या पत्नी हेमलता खळदे या नगरसेवक पदावरही निवडून आल्या होत्या. तर जनसेवा विकास समितीचे सहा नगरसेवक ही निवडून आले होते. त्यानंतर खळदे आणि आवारे यांच्यात वैचारिक मतभेद होऊन दोघेही वेगळे झाले होते.(Pimpri News)

दरम्यान, डिसेंबर २०२१ मध्ये खळदे याने आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई येथे जाहीर प्रवेश केला होता. डिसेंबर २०२२ मध्ये वृक्षतोडीच्या प्रकरणातील वादावरून किशोर आवारे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात चंद्रभान खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचा राग मनात धरून खळदे याने आवरे यांच्या खुनाची सुपारी दिली, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली.(Pimpri News)

 

याबाबत बोलताना पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे म्हणाल्या कि, किशोर आवारे खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच हल्लेखोरांना अटक केलेली आहे. अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या गौरव खळदे याच्या तपासात त्याच्या वडिलांचाही या खून प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी भानू खळदे याचा शोध सुरू केला. मात्र मागील दीड महिन्यापासून तो फरार होता. अखेर खळदे याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.(Pimpri News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Pune News : पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय..उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.