पावसाळ्यातही तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता… हे उपाय नक्की फॉलो करा!
Health Tips : पुणे : आला पावसाळा, तब्येत सांभाळा, असे म्हटले जाते. पावसामुळे अनेक प्रकारचे संसर्ग पसरतात. पाऊस आपल्यासोबत फक्त आजारच नाही तर त्वचेचे इन्फेक्शनही घेऊन येतो. पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असतो, त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे चेहरा पुन्हा पुन्हा स्वच्छ करावा लागतो. पावसाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते. जाणून घेऊया पावसाळ्यात त्वचेच्या काळजी घेण्याच्या काही टिप्स… हे उपाय फॉलो करुन पावसाळ्यातही तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता.
पावसाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक
– पावसाळ्यात वातावरणात थंडावा वाढू लागताच तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करता. मात्र, त्यामुळे त्वचेचा मऊपणा कमी होतो. त्वचा कोरडी आणि रखरखीत होते. यासाठी पावसाळ्यात कोमट पाण्याने अंघोळ करा.
– पावसाळ्यात भरपूर पाणी प्या. या काळात दिवसभरात जवळजवळ आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. पाण्यासोबतच तुम्ही लिंबू पाणी, नारळपाणी, पिऊ शकता.
– त्वचा हाताला रखरखीत लागत असेल तर तुमच्या त्वचेला मॉइस्चरायझरची गरज आहे. (Health Tips ) स्कीन केअर रूटिनमध्ये यासाठी योग्य मॉइस्चराइझरची निवड करा. पावसाळ्यात तुम्ही जेल बेस्ड मॉइस्चराइझर वापरू शकता.
– पावसाळ्यात तेलकट, चमचमीत पदार्थ खाल्ले जातात. ज्याचा परिणाम त्वचेवर होतो. यासाठी योग्य आणि संतुलित आहार घेण्यावर भर द्या. आहारात भरपूर सॅलेड, ताज्या भाज्यांचा समावेश करा.
– चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चराइजर लावण्यासोबतच आठवड्यातून एकदा स्क्रबिंग करा.
– पावसाळ्यात त्वचेची काळजी घेताना नियमित क्लिंझिग करणे गरजेचे आहे. (Health Tips ) यासाठी सकाळी उठल्यावर, झोपण्यापूर्वी आणि मेकअप काढल्यावर त्वचेला क्लिंझिंग करावे.
– क्लिंझिंग करण्यासाठी तुम्ही कच्चे दूध, बटाट्याचा रस, काकडीचा रस वापरून तुमची त्वचा स्वच्छ करू शकता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : तुतीचे फळ खाण्याचे फायदे
Health Tips : चेहरा अधिक चमकदार आणि तरुण दिसण्यासाठी चेहऱ्याला द्या वाफ
Health Tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी लसूण गुणकारी, जाणून घ्या कसे करावे सेवन