Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : जेजुरीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, डेक्कन मधुन अजून दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 July 2023, 14:08

Pune News : जेजुरी येथील धालेवाडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मेहबूब सय्यदलाल पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील २ आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने डेक्कनमधून अटक केली आहे. आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ४ झाली आहे. तर एक आरोपी फरार असून त्याचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.(Pune News)

अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ४ झाली आहे.

वनीस प्रल्हाद परदेशी (रा. ४०४, गुरुवार पेठ, पुणे) आणि महादेव विठठल गुरव ऊर्फ काका परदेशी वय ६५ वर्षे, रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर यापूर्वी पोलिसांनी महिला आरोपी किरण वणेश परदेशी (वय–३८) आणि मुलगा स्वामी वणेश परदेशी (वय-१९) ( दोघेही रा. जेजुरी, ता. पुरंदर) यांना अटक केली होती. त्या दोन्ही आरोपींना सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयांना दोघांना ११ जुलैपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.(Pune News)

पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबूब पानसरे यांच्याबरोबर जमिनीच्या वादातून आरोपी वणेश प्रल्हाद परदेशी, महिला आरोपी किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी, काका परदेशी आणि एक लाल शर्ट घातलेला अनोळखी इसम यांनी बाचाबाची सुरू केली.(Pune News)

 

यातच आरोपी वणेश याने मेहबूबभाई पानसरे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या मेहबूबभाई पानसरे यांना जेजुरीतील खासगी रुग्णालयात तेथून पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचारादरम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला होता.(Pune News)

मेहबूब पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी दोन्ही आरोपी डेक्कन परिसरात येणार आहेत, अशी गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून वनीस परदेशी आणि महादेव विठठल गुरव ऊर्फ काका परदेशी या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.(Pune News)

दरम्यान, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी वरील गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जेजुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर एक अनोळखी आरोपी फरार असून त्याचे अद्याप नाव समोर आले नाही. पोलीस त्यादृष्टीने पुढील तपास करीत आहेत.(Pune News)

हि कारवाई पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार खंडणी विरोधी पथक- २, गुन्हेशाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, (Pune News) पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन अपाटे, प्रदिप गाडे, पवन भोसले यांच्या पथकाने केली आहे.(Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54
Next Post

Health Tips : पावसाळ्यातही तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता... हे उपाय नक्की फॉलो करा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.