डॅा. अभिजीत इचके (वरीष्ट अधिक्षक पुणे डाक विभाग)
Career News शिरूर : मला विचारू नका मी कुठ पर्यंत आलोय… कारण तुम्हाला माहित नाही मी सुरूवात कुठून केली. स्पर्धात्मक परीक्षांवर बोलताना खूप काही सांगाव अस वाटतय. तुम्ही नातेवाईकांमध्ये काय करता हे जाहिर करू नका, कारण ते सगळ्यात जास्त मानसिकता बिघडविण्याचे काम नातेवाईक करत असतात. (Career News) संघर्षाचा कालावधी असतो. (Career News) त्यावेळी तुमच करियर वर मोठा परिणाम होतो. (Career News)
प्रयत्न करा अन यश मिळवा. तुम्ही जर स्पर्धा परिक्षा देत असाल तर तुमची कुवत किती आहे. त्यावर संघर्ष अवलंबून असतो. लाखोवर विद्यार्थी यामध्ये संघर्ष करून नशीब अजमावत असतात. त्यातून याचा निकाल खूप कमी लागतो. त्यामुळे शिक्षण घेताना तुम्ही स्पर्धा परिक्षा बरोबर वेगळा पर्याय शोधून ठेवला पाहिजे.
ज्यावेळी तुम्ही सेवेत रूजू होता. त्यावेळी तुम्ही अधिकारी म्हणून राजकीय, सामाजीक अडचणीतून काम करत असता. त्यातून तुम्हाला संयमाने निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे तुम्ही कसे रहाता हे अवलंबून असते. स्पर्धा परिक्षा देत असताना नोट काढायची तयारी ठेवा. पण यासाठी तुम्हाला १८ तास अभ्यास करावा लागतो. तर ते चुकीचे आहे. जो अभ्यास कराल ते पुन्हा न वाचता लक्षात राहिले पाहिजे. त्याबरोबर
प्रश्नपत्रीका कशी आहे. हे माहित असणे गरजेचे आहे. प्रश्न कर्त्याला काय अपेक्षीत आहे. हे माहित असणे गरजेचे आहे. वृत्तपत्र वाचत असताना तुम्हाला त्यातून काय वाचायचय हे माहित असले पाहिजे. क्लास लावा अथवा लावू नका. कारण सध्या आता इंटरनेटवर सगळ्या गोष्टी मिळू लागल्या आहे. तुम्ही कोणती परिक्षा देता यासाठी तुम्हाला मार्गदर्शक असणे गरजेचे आहे.
स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शक महत्वाचा आहे. कोणतेही क्षेत्र निवडताना तुमची कुवत ओळखा त्या बरोबर त्यात करीयर करा. स्पर्धा परिक्षा बरोबर इतरही वेगवेगळे क्षेत्रात करीयर करू शकता. तुम्ही जे ठरवाल त्यात तुम्ही करीयर करू शकता. त्यात तुम्हाला करीयर करू शकता. शेती, शास्त्रज्ञ, इंजीनियर, वकिल, व्यवसायीक उद्योगधंदे यासारख्या ठिकाणी करीयर करू शकता.
तुमचे प्राथमिक शिक्षणात पाया भक्कम असणे सगळ्यात महत्वाचे आहे. सुरूवातीपासून चांगले गुण मिळवा. चांगले क्लास लावा त्यातून तुम्हाला बुद्धिमत्तेला चालना मिळाली पाहिजे. वेगवेगळ्या प्रश्नपत्रीका सोडवा. त्यातून तुमचे स्पर्धेला सामोरे जाता आले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी वेळेला महत्व द्या. करीयर, आरोग्य व नात्याला तडा जाणार नाही. याकडे लक्ष दिले पाहिजे. जिद्दीने अभ्यास करा तुम्हीच तुमचे यश मिळू शकता.
शब्दांकन : युनूस तांबोळी