Pune News : पुणे : पुणे आणि पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरात मागील काही दिवस पाऊस सुरु आहे. पुणे शहरात फार पाऊस नाही. मात्र घाटमाध्यावर आणि लोणावळ्याच्या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटनाला जाताना काळजी घ्यावी. असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
८ आणि ९ जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील घाट भागात गेल्या २४ तासांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ८ आणि ९ जुलै रोजी ‘घाट परिसरातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सोमवारपासून (१० जुलै) पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ताम्हिणी घाटात २१० मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर लोणावळ्यामध्ये १०३ मिमी आणि शिरगाव, मावळमध्ये १६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Pune News) शहराच्या हद्दीसह जिल्ह्याच्या इतर भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही.
दरम्यान, पावसाचा जोर वाढणार असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवार असल्याने अनेक तरुण मंडळी ट्रेकला किंवा वर्षा विहाराला निघत असतात. (Pune News) मागच्या रविवारी काही पर्यटक लोहगडावर तीन तास अडकले होते. त्यावेळी अनेक पर्यटकांची गैरसोय झाली होती. यावेळी देखील रविवारी पर्यटनाला जाताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चार वर्षाची चिमुकली शाळेत जाताना स्कूल बसमध्ये झोपली अन् तब्बल ३ तास बसमध्ये अडकली
Pune News : खुनाच्या गुन्हयातील अट्टल गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या