Ghodegaon News : घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव) गावाजवळ प्रियकरासह चौघांनी मिळून एका महिलेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणात घोडेगाव पोलिसांनी प्रियकराला तत्काळ ताब्यात घेतले होते. तर या गुन्ह्यातील फरार झालेल्या ३ आरोपींना घोडेगाव पोलिसांनी भीमाशंकर परिसरातील जंगलातून ताब्यात घेतले आहे.
भीमाशंकर परिसरातील जंगलातून अटक
आदेश अशोक जाधव, संदेश अशोक जाधव (दोघे रा. पिंपळगाव घोडे, ता. आंबेगाव) व संजय सुरेश शिंदे (रा. जवळके, ता. खेड) यांना घोडेगाव पोलिस ठाण्यातील पथकाने भीमाशंकर परिसरातील जंगलातून ताब्यात घेण्यात आले. (Ghodegaon News) आकाश चंद्रकांत भालेराव याला त्याच दिवशी पोलीसांनी ताब्यात घेतले होते.
घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला आणि आकाश चंद्रकांत भालेराव या दोघांचे प्रेमसंबंध आहेत. (Ghodegaon News) शुक्रवार (दि.२३) रोजी ते दोघे मोटारसायकल वरून चालेले होते. त्यावेळी मोटरसायकल वरून संदेश अशोक जाधव, संजय आणि आदेश अशोक जाधव हे तिघे आले.
दरम्यान, आरोपींनी महिलेला घोडेगाव (ता. आंबेगाव) गावाजवळील निर्जनस्थळी नेले. आणि पिडीतेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अंगावरील कपडे काढून आळीपाळीने सामूहिकरीत्या बलात्कार केला. “याबाबत जर कोणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही”, अशी धमकीही आरोपींनी दिली.
त्यानंतर पिडीत महिलेने तात्काळ घोडेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि घडलेल्या प्रकार पोलिसांना सांगितला.
याप्रकरणी पिडीत महिलेनी दिलेल्या फिर्यादीनुसार घोडेगाव पोलिस ठाण्यात चार जणांच्या विरोधात सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी पिडीत महिलेचा प्रियकर आकाश चंद्रकांत भालेराव याला ताब्यात घेतले आहे. (Ghodegaon News) तर पोलीस उर्वरित तीन आरोपीचा शोध घेत होते. घोडेगाव पोलिसांनी विविध ठिकाणी आरोपींचा तपास करून अखेर भीमाशंकर परिसरातील जंगलातून या तीन जणांना ताब्यात घेतले आहे..
हि कामगिरी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज, पोलिस हवालदार मनीषा तुरे, अमरदीप वंजारी, समीर कांबळे, नीलेश तळपे, स्वप्नील कानडे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी! पर्यटकांनी काळजी घ्यावी – हवामान खात्याकडून आवाहन
Pune News : चार वर्षाची चिमुकली शाळेत जाताना स्कूल बसमध्ये झोपली अन् तब्बल ३ तास बसमध्ये अडकली