राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत (ता. दौंड) येथे सुमारे २०-२५ हजार लोकसंख्येचे गाव असून गावात वेगाने शहरीकरण होत आहे. मात्र, गावाने प्राचीन परंपरा जपली आहे. त्यानुसार संपूर्ण गाव हे उद्या रविवारी (ता. ०९) वनभोजनासाठी संपूर्ण बंद राहणार आहे. Yavat News
जुन्या परंपरेप्रमाने रविवारी सकाळी यवत गावातील सर्व ग्रामस्थ श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मीची मातेला नैवेद्य व नारळ फोडून आपआपली घरे व दैनंदिन व्यवहार बंद ठेवतात. या प्रथेप्रमाणे सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत यवत गाव हे संपूर्णपणे बंद राहणार आहे. त्यानंतर संपूर्ण गावातील रहिवाशी घराला टाळे लाऊन वनभोजनासाठी गावाबाहेर पडतात. त्यामुळे गावात कोणीही दुचाकी अथवा चारचाकी वाहने घेऊन फिरू नये असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. Yavat News
दरम्यान, रविवार असल्याने बँका, शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे गावात येणाऱ्या बाहेरील लोकांना गावात कोणत्याही प्रकारचा प्रवेश मिळू नये यासाठी रस्त्यांवर दोरी बांधून प्रवेश नाकारण्यात येणार आहे.