Pune News : पुणे : चार वर्षाची चिमुकली शाळेत जाताना स्कूल बसमध्ये झोपली अन् तब्बल ३ तास त्या बंद बसमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कल्याणी नगर येथील बिशप को-एड स्कूलमध्ये घडली आहे. चालक आणि महिला केअर टेकरचा निष्काळजीपणा यामुळे उघडकीस आला आहे. तर पुण्यात पुन्हा शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षीततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
पुण्यात शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षीततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षाच्या मुलीला तिच्या आजीने शाळेत सोडणाऱ्या बसमध्ये बसवून दिलं होतं. त्यानंतर ती बस मुलीला घेऊन शाळेत गेली. मात्र या प्रवासादरम्यान या मुलीला झोप लागली. शाळेत पोहचल्यावर बसमधून बाकी विद्यार्थी उतरले मात्र ही मुलगी झोपली असल्याने शाळेत पोहचल्यावर उतरली नाही.
काही वेळाने तिला जाग आल्यावर तिने आरडाओरड सुरु केली. मात्र शाळेजवळील निर्जन भागात बस उभी असल्याने तिचे रडणे कुणापर्यंत पोहोचले नाही. (Pune News) सुदैवाने शाळेत आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या एका पालकाने मुलीला बसमध्ये अडकलेले पाहिले. तत्काळ शाळा व्यवस्थापनाला कळवले आणि दुपारी दोनच्या सुमारास मुलीला बाहेर काढण्यात आले. सुमारे तीन तास बसमध्ये अडकली होती.
दरम्यान, चालक आणि महिला महिला केअर टेकर यांच्याकडून पूर्ण निष्काळजीपणाची ही घटना घडली. पालकांनी या घटनेची चौकशी केली असता शाळेच्या अधिकाऱ्यांनीही योग्य उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. शाळा व्यवस्थापन आणि बस सेवा चालकाचे हे निष्काळजीपणा आहे.
याबाबत बोलताना चार वर्षांच्या मुलीचे वडिल तरनदिप सिंह म्हणाले कि, आमची मूलगी शाळेच्या बसमध्ये मदतीसाठी ओरडत होते हे कळल्यावर आम्हाला धक्का बसला. ते सुरक्षीत हातात असतील या विश्वासाने आम्ही आमच्या मुलांना शाळेच्या स्वाधीन करतो. (Pune News) पण या घटनेनंतर, मला माझ्या मुलाला एकटे सोडण्याची भीती वाटते. तसेच या घटनेबाबत येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून शाळा व्यवस्थापन आणि बसचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खुनाच्या गुन्हयातील अट्टल गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pune News : हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांची बदली…