हनुमंत चिकणे
Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : घरात कोणी नसल्याची संधी साधत सोन्याचे दागीणे व रोख रक्कम असा किंमती मुद्देमाल चोरून नेणाऱ्या एका चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. Uruli Kanchan News
राजकुमार ओकांरआप्पा आपचे (वय २८, धंदा मजुरी, मुळ रा. कोथळी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद, सध्या रा. होम मेट सोसायटी आपुलकी बार समोर, महादेवनगर, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ४ लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्वरगंधा सोसायटीत सोमवारी (ता. २६) राहत्या सदनिकेचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश करुन सोन्याचे दागीणे व रोख रक्कम असा किंमती मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करुन चोरी करुन नेल्याची तक्रार डॉ. किरण सुहास शिंदे, (वय ३७, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांना दिली होती.
सदर घटनेचा लोणी काळभोर पोलीस तपास करीत असताना उरुळी कांचन ते हडपसर परिसरातील शेकडो सी सी टी व्ही फुटेज चेक करुन, तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदाराचे आधारे आरोपीतांचा शोध घेत होते. यावेळी तपास पथकातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, शैलेश कुदळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, उरुळी कांचन येथील बंद घरातुन चोरी करणारा इसम हा कवडीपाट टोलनाका परिसरात थांबला आहे. (Uruli Kanchan News)
सदर घटनेची वरिष्ठांना माहिती देऊन त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस पथकाने सदर आरोपीला टोलनाका परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव वरीलप्रमाणे सांगितले. त्याचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास केला असता सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली पोलिसांना दिली. तसेच सदर गुन्ह्या व्यतिरीक्त व्यतिरीक्त लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ४ लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, आरोपीने गुन्हयाव्यतिरीक्त पुणे शहर, पिंपरी चिंचवड, व पुणे जिल्हा परिसरात आणखी १० ते १२ घरफोडीचे गुन्हे केले असल्याची माहिती पोलिसांना दिली असून त्या दृष्टीने त्याच्याकडे अधिक तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे,पोलीस हवलदार सातपुते, नितीन गायकवाड, सायकर, बोरावके, जाधव, नागलोत, शिरगीरे, कुदळे, वीर, सोनवणे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे. Uruli Kanchan News