Big Breaking : नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. एकीकडे अजित पवारांच्या सत्तेत येण्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला धोका निर्माण झाल्याची चर्चा होत आहे, तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मी भाजपची आहे; पण भाजप माझी थोडीच आहे…
भाजपमध्ये पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय व्यासपीठावर सतत होत असते. मागच्या महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमात मुंडे यांनी पुन्हा एकदा नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. मला कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. (Big Breaking ) कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन. कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा मला नाही. मी भाजपची आहे; पण भाजप माझी थोडीच आहे… असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात केले होते. यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, भाजप नेते पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. पंकजा मुंडे यांनी दोन वेळा दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे सांगितलं जात आहे.
यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना बीआरएस पक्षाने थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. यापूर्वी एमआयएमने देखील पंकजा मुंडे यांना साद घातली होती. या वेळी मी अद्याप कोणत्याही ऑफरचा विचार केलेला नाही, पण करणारच नाही, असेही नाही… असे सूचक वक्तव्य केले होते. (Big Breaking ) बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना जाहीर प्रश्न विचारला होता, मी डाव्या बाजूला गेले तर तुम्ही मला साथ देणार का? या सर्व सूचक वक्तव्यावरून पंकजा मुंडे लवकरच आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांसोबत पक्ष प्रवेशची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगलीतील बड्या नेत्याकडून पंकजा मुंडे यांच्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं राजकीय वैर सर्वांनाच ज्ञात आहे. (Big Breaking ) धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर सध्या पंकजा मुंडे महासचिव आहेत. आधीच नाराज असलेल्या पंकजा मुंडे आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत मात्र अजून त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking : मोठी बातमी! अजित पवार गटाला ४४ आमदारांचा पाठिंबा… पुतण्याचा काकांना दे धक्का!
Big Breaking : अजितदादांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांना नोटीस; अपात्र ठरण्याची शक्यता?