Pune News : पैसे उधार न दिल्याने चंदननगर भागातील एका कपडे दुकानदार मालकावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या ४ गुन्हेगारांची चंदननगर पोलिसांनी भरचौकातून धिंड काढली आहे. या कारवाईने पोलिसांनी गुन्हेगारांना एकप्रकारे इशारा दिला आहे.(Pune News)
पोलिसांनी गुन्हेगारांना एकप्रकारे इशारा दिला आहे.
संकेत कमलाकर खोत, ओमकार रिआप्पा खुपसू, मंगेश गणेश मोरे आणि गणेश गौतम कोरडे अशी धिंड काढण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहे. याप्रकरणी चंदननगर भागातील एका कपडे दुकानदार मालकाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चंदननगर परिसरात साईनाथनगर येथे अंजली कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. दरम्यान, फिर्यादी यांच्या कपड्याच्या दुकानात आरोपी ओमकार खुपसुगे हा कपडे खरेदी करण्यासाठी आला होता. यावेळी त्याने पैसे उधार न दिल्याने राडा घातला होता.(Pune News)
त्यानंतर आरोपी ओमकार खुपसुगे त्याच्या इतर दोन साथीदारांना घेऊन आला आणि कोयत्याने दुकानाची बाहेरील दरवाजाची व दुकानाच्याही काचा फोडल्या. या प्रकारामुळे आजबाजुस असलेल्या दुकानदारानी घाबरून दुकाने बंद केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.(Pune News)
या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी आरोपी संकेत कमलाकर खोत, ओमकार रिआप्पा खुपसू, मंगेश गणेश मोरे, गणेश गौतम कोरडे यांना अटक केली. व त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढली.(Pune News)
दरम्यान, पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. काही शहरातील सदाशिव पेठ परिसरात भरचौकात तरुणीवर कोयता हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पोलिसही अलर्ट मोडवर आले आहेत.(Pune News)