Big Breaking : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी बंडखोरी करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. अजित पवारांचे हे बंड यशस्वी झालं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, शरद पवार आणि अजित पवारांच्या बलाबलाची संख्या समोर आली आहे. अजित पवार गटाला ४४ आमदारांनी पाठिंबा दर्शवल्याची माहिती समोर आली असून, फक्त १२ आमदार शरद पवारांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहेत. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेच्या ४२ आणि विधान परिषेदच्या २ आमदारांचं समर्थन आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटालाच बहुमत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आमदारांच्या बलाबलनंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.
अजित पवार समर्थक आमदारांनी ‘देवगिरी’ निवासस्थानी भेट दिली आहे. यामध्ये अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर, विक्रम काळे, अनिकेत तटकरे, सतिष चव्हाण हे आमदार अजितदादांच्या भेटीला आल्याचं पाहायला मिळालं. (Big Breaking) इतर आमदारांनी आज अजितदादांची भेट घेतली. हे आमदार अजित पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळत आहे.
राजकीय बंडाच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी पक्ष संघटनेवर आपला दावा सांगितला. शरद पवार यांनी कराडचा दौरा करुन आपली राजकीय ताकद दाखवून दिली.(Big Breaking) त्याच दिवशी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची निवड केली. तर अजित पवार यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवलं. दोन्ही गटांकडून परस्परविरोधी नियुक्त्या सुरु झाल्या. शरद पवारांसोबत आमदार असल्याचे चित्र दिसत होते. पक्ष संघटनेवर पकड मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते.
शरद पवार यांच्या गटाकडे फक्त १२ आमदारांच समर्थन
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आज मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. अजित पवार यांच्या गटाचा मेळावा बांद्रा एमआयटी येथे होणार आहे, तर शरद पवार गटाचा मेळाला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार आहे. या दोन्ही मेळाव्यांआधी एक महत्वाची बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत एकूण ५४ आमदार आहेत. (Big Breaking) याचा अर्थ शरद पवार यांच्या गटाकडे फक्त १२ आमदारांच समर्थन उरलं आहे. महत्वाचे म्हणजे अजित पवार यांनी फक्त पत्रावर आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या नाहीत. त्यांनी आमदारांकडून प्रतिज्ञापत्र घेतले आहे. त्यामुळे अजित पवार गटाने नेमलेले प्रतोद अनिल पाटील यांचा व्हीप या आमदारांना लागू होतो. हा व्हीप मोडल्यास आमदारांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. थोड्याच वेळात नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking : मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांवर बडतर्फीची कारवाई; शरद पवार संतप्त!