Pimpri News : पिंपरी : मालकाने खोली भाडेतत्वावर चालविण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून इमारतीमधील आठ ते नऊ खोल्यांच्या खिडक्यांच्या काचा, पाण्याच्या टक्या व सोलर सिस्टम कोयत्याचे साहाय्याने तोडफोड करून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल
राजेंद्र प्यारालाल आर्या (वय ५५, रा. कामोठा, नवी मुंबई) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३०) तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शुभम शांतीलाल चव्हाण (रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Pimpri News) मावळ तालुक्यातील मौजे आंबी येथे गुरुवारी (दि. २९) रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने त्यांच्या मालकीची खोली भाडेतत्त्वावर चालविण्यास दिली नाही. आरोपीने याचा राग मनात धरून त्याच्या मित्रासह फिर्यादीची खोली असलेल्या इमारतीत आला. (Pimpri News) तेथील आठ ते नऊ खोल्यांच्या खिडक्यांच्या काचा व कमोड भांडे, वाॅश बेसीन भांडे, पाण्याच्या टाक्या, सोलर सिस्टम कोयत्याच्या साह्याने तोडफोड करून नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : सणाकरीता दिलेले पैसे परत मागितल्याने शिवीगाळ व धक्काबुक्की करून महिलेवर बलात्कार