Mansoon Update News : पणे : महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस अखेर उजाडला आहे. नैऋत्य मान्सून अखेर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दाखल झाला आहे. ही आनंदाची बातमी भारतीय हवामान विभाग, पुणे चे विभागप्रमुख डॉ. के. होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. दरवर्षी सरासरी १५ जूनपर्यंत पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतो; यंदा मात्र तब्बल दहा दिवसांनंतर मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. (Mansoon Update News)
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळं मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला होता. अखेर मान्सून केरळमध्ये ८ जूनला म्हणजेच सात दिवस उशिरा दाखल झाला. केरळमध्ये मान्सून १ जूनला दाखल होतो. त्यानंतर मान्सून ७ जूनपर्यंत दाखल होतो. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळं मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. (Mansoon Update News)
चक्रीवादळाची स्थिती थंडावल्यानंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आणि आज अखेर या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मान्सूनने अखेर महाराष्ट्र व्यापल्याने शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. (Mansoon Update News)
प्रत्येकवर्षी सर्वसामान्य नैऋत्य मान्सून अरबी समुद्रातून भारतातील केरळात सर्वप्रथम दाखल होतो. त्यानंतर मुंबईतून संपूर्ण राज्यात पोहचतो. यंदा मात्र बंगालच्या उपसागरातून दुसऱ्या शाखेमार्फत मान्सून पूर्वेकडील राज्यांमधून भारतात दाखल झाला. त्यामुळे महाराष्ट्रात देखील विदर्भामार्गे सर्वप्रथम मान्सून दाखल झाला. त्यामुळेच मुंबईसह दिल्लीत आज एकाचवेळी मान्सून सक्रिय झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून यापूर्वी स्पष्ट करण्यात आली होती. (Mansoon Update News)
देशात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मूच्या काही भागातही मान्सून दाखल झाला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र देखील मान्सूनने व्यापला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकेल आणि देशातील इतर भाग देखील व्यापेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे संचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे. (Mansoon Update News)
दरम्यान, खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून पूर्वतयारी सुरु आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मशागतीची कामे करत आहेत. मान्सूनचं आगमन दक्षिण महाराष्ट्रात झाल्यानं शेतीच्या कामांना वेग येणार आहे. गतवर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं हैराण झालेल्या शेतकऱ्याला यंदाच्या मान्सूनकडून अपेक्षा आहेत. मान्सूनचा पाऊस व्यवस्थित झाल्यास राज्यातील शेतकरी शेतीतून भरघोस उत्पन्न काढू शकतात. त्यामुळं यंदाचा मान्सून शेतकऱ्यांना तारणारा ठरतो, हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ठरणार आहे. (Mansoon Update News)