लोणी काळभोर, (पुणे) : येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन व ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी रेनबो स्कूलचे अध्यक्ष नितीन काळभोर यांनी मुलांना ऑलिम्पिक दिनाची माहिती देऊन खेळाचे व आरोग्याचे महत्व सांगितले. तसेच ऑलिम्पिक मध्ये विद्यार्थी अधिकाधिक सहभागी झाले पाहिजे असे मत काळभोर यांनी व्यक्त केले. प्रमुख पाहुणे झुंजार सरांनी खेळ कसा जीवनाला नवीन आकार देऊ शकतो. तसेच शारीरिक स्वास्थ्याचे महत्त्व सांगून शरीरातील ऊर्जा कायम राहण्यासाठी नियमितपणे योगासने आणि शारीरिक खेळ याचा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला.
शिक्षिका नीला सायकर यांनी सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच योग प्रशिक्षक झुंजार सरांनी योगासनाची विविध प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेत विविध योगासने केली. सीमा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी चित्तथरारक ह्यूमन योगा स्ट्रक्चर उभारले होते.
कलाशिक्षक दिपक शितोळे यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आकर्षक फलक लेखन केले होते. शिक्षक निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलिम्पिक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची ध्वनीक्षेपण व्यवस्था ऐश्वर्या बधे यांनी सांभाळली.
यावेळी रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष नितीन काळभोर, व्यवस्थापिका मंदाकिनी काळभोर, प्राचार्या मीनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हारे, पर्यवेक्षिका पायल बोळे, क्रीडा शिक्षक निखिल जाधव, योग प्रशिक्षक सन्माननीय झुंजार सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी थोरात व समृद्धी वलांडे या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.