Pune News पुणे : एका सफाई कर्मचाऱ्याला अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे. पार्किंगसाठी खोदलेल्या खड्डयात हा सफाई कर्मचारी पडला होता. सदर घटना पुण्यातील सहकारनगर परिसरात घटना घडली आहे. (Pune News) तुकाराम देठे (राहणार चव्हाण नगर, पुणे, वय वर्ष 60) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तुकाराम देठे यांच्या हाताला व पायाला मार लागल्याने तातडीने शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे. (Pune News)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सहकारनगर परिसरात ज्ञानदिप सोसायटी या पाच मजली इमारतीत तळमजला येथे हायड्रोलिक पार्किंगकरिता सुमारे 15 फुट खाली खड्डा खोदाई केला आहे. शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता या खड्डयात तेथे सफाई काम करणारे कर्मचारी पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तातडीने हजर झाले. त्यांनी तेथील खुर्चीचा वापर करुन रश्शी बांधत देठे यांना शिडीच्या सहाय्याने सुमारे 15 मिनिटात बाहेर काढले.
सदरची कामगिरी जनता अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन चालक सागर देवकुळे तसेच तांडेल संदिप घडशी व जवान महेंद्र सकपाळ, शैलेश गोरे, आशिष जाधव, विजय वाघमारे यांनी केली.