Health Tips : आहारातील बदल आणि बदलती जीवनशैली हे युरिक अॅसिड वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. लिव्हर आणि किडनीच्या कार्यावर परिणाम होऊन युरिक अॅसिडची पातळी बिघडते.
प्राथमिक अवस्थेत उपचार आणि आहार संतुलित ठेवल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येते
पायाची बोटे किंवा पायाच्या अंगठ्यात वेदना आणि सूज असेल, जर घोट्याच्या आणि गुडघ्यांच्या दुखण्याने त्रस्त असाल तर हे युरिक अॅसिड वाढण्याचे लक्षण आहेत. अति मांसाहार, कमी पाणी पिणे, दारू पिणे, (Health Tips) हाय प्रोटीनयुक्त आहार घेणे, याशिवाय काही अनुवांशिक कारणेही असू शकतात.मात्र, त्यावर प्राथमिक अवस्थेत उपचार सुरू केल्यास आणि आहार संतुलित ठेवल्यास त्यावर सहज नियंत्रण ठेवता येते. जाणून घ्या युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा तसेच कोणते पदार्थ टाळावे याविषयी माहिती –
युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी आहार
ताजी फळे आणि भाज्या, जसे की जांभुळ, संत्री, शिमला मिरची. बटाटे, भात, धान्याचा ब्रेड आणि पास्ता खाऊ शकता. युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी जांभुळ खूप फायदेशीर आहे. (Health Tips) लिंबू हे सायट्रिक अॅसिडने समृद्ध असलेले फळ आहे जे शरीरातील अतिरिक्त यूरिक अॅसिड बाहेर काढण्यास खूप मदत करते.
युरिक अॅसिडची समस्या असेल तर या पदार्थांचे सेवन टाळा
सोडा, आइस्क्रीम, कँडी, फास्ट फूड, अल्कोहल, रेड मीट, सी फूड.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : दररोज तळपायाची मालिश करण्याचे फायदे
Health Tips : चष्मा घालून नाकावर डाग पडलेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पहा
Health Tips : पित्ताच्या त्रासावर आवळा गुणकारी, जाणून घ्या नियमित आवळा खाण्याचे फायदे