Shirur News शिरूर : योगासाठी कोणतेही निमित्त नको ती प्रत्येक माणसाची गरज झाली पाहिजे. आपले आरोग्य आयुष्य अनमोल आहे. (Shirur News ) योग आणि प्राणायम यांच्या सवयीने शरीर अधिक उर्जावान होऊन यशाकडे वाटचाल होऊ लागते. (Shirur News ) आपल्या पाल्यांना या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात मानसिक व शाररिक बळ देण्यासाठी रोज अर्धातास योग व प्राणायम करून घेतला पाहिजे. (Shirur News ) पालकांनी यामध्ये सामिल झाले पाहिजे. (Shirur News ) असे मत बापूसाहेब गावडे विद्यालयाचे सचीव राजेंद्र गावडे यांनी व्यक्त केले. (Shirur News )
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील ग्रामिण विकास शिक्षण मंडळाचे मा. बापूसाहेब गावडे विद्यालयात जागतीक योग दिनानिमित्त योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य आर. बी. गावडे, रणजीत गावडे, स्वप्निल गावडे, भरत घोडे, महेद्र गायकवाड आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना गावडे म्हणाले की, मनुष्य अर्धे आयुष्य धावपळीत पैसे कमविण्यासाठी घालवितो. अर्धे आयुष्य पैशाने आरोग्य विकत घेण्याचा प्रयत्न करतो. आरोग्य ठिक नसेल तर ऐश्वर्य व्यर्थ आहे. म्हणूनच आरोग्यम धन संपदा असे म्हटले जाते. विद्यार्थ्यांनी ताणतणाव दूर करण्यासाठी दररोज योगा व प्राणायम करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर निचीत यांनी केले.