Pune News : वेल्हे, (पुणे) : मागील आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी (ता. १८) सकाळी हा मृतदेह आढळला असून मृतदेहाच्या जवळ काही वस्तू सापडल्या आहेत. त्याच्यावरून मृतदेहाची ओळख पटवली जात आहे. (Pune News)
दर्शना दत्तू पवार, असे मृत झालेल्या तरुणीचे नाव असून तिने नुकतीच एमपीएससीची परीक्षा पास झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाली होती. (Pune News)
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १५) दर्शना पवार हरविल्याची तक्रार नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. रविवारी सकाळी वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह सापडला आहे. सापडलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून मृतदेहाच्या जवळ काही वस्तू सापडल्या असून त्यावरून तरुणीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. (Pune News)
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाची आणखी ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. साधारण आठ दिवसांपूर्वी हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. (Pune News)
दरम्यान, संबधित तरुणी ही पुण्यात एमपीएससी करत होती. ती परीक्षा ती पासही झाली होती. मात्र, आठ दिवसानंतर अचानक मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोठ्या घातपाताची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. (Pune News)