युनूस तांबोळी
Shirur News शिरूर : ग्रामीण भागात स्पर्धात्मक परिक्षेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिसून येऊ लागली आहे. (Shirur News) वेगवेगळ्या क्षेत्रात निर्माण झालेल्या स्पर्धेला विद्यार्थी सामोरे जाऊ लागले आहेत. (Shirur News) भविष्यात मिळालेल्या गुणवत्तेचा विकास करून त्या त्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे. (Shirur News) आई वडीलांनी कष्टातून तुमच्यात निर्माण केलेल्या जिद्दीला प्रोत्साहित ठेवून मिळालेल्या क्षेत्रात यश संपादन करण्याचे आवाहन शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले आहे. (Shirur News)
शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्याहस्ते सन्मान
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील साक्षी गोरक्षनाथ ईरोळे व करण राजेंद्र पवळे यांनी निट परिक्षेत गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे, घोडगंगाचे माजी संचालक राजेंद्र गावडे, संचालक सोपानराव भाकरे, प्रशासकीय अधिकारी शिवाजी बोखारे , भाजपाचे उपाध्यक्ष सावित्राशेठ थोरात, बाबाजी निचित आदी मान्यवर उपस्थित होते.
गावडे म्हणाले की, या वर्षी ग्रामीण भागातून पोलिस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्या पाठोपाठ वैद्यकिय शिक्षणासाठी मिळालेली गुणवत्ता पहाता खेडोपाडी डॅाक्टर तयार होण्यास मदत झाली आहे. या विद्यार्थ्यांनी गावात व वाडीवस्तीवरील रूग्णांची सेवा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तीच खरी देशसेवा विद्यार्थ्यांकडून होईल.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्जून निचित यांनी केले.
यावेळी सरपंच बिपीन थिटे, चांदाशेठ गावडे, अशोक माशेरे, प्राचार्य आर. बी. गावडे, माजी प्राचार्य प्रभाकर खोमणे, मिना शाखा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रकाश वायशे, चेअरमन सोनभाऊ मुसळे, सरपंच विक्रम निचित,सुभाष खोसे, कचरदास बोचरे,पठारे सर, प्रकाश भाकरे,पोपट बोऱ्हाडे, सखाराम खामकर, दिपक दुडे, बबनराव पोकळे, आण्णा पळसकर, रखमा निचित, पोपट जाधव , थोरात गुरुजी, बन्सी खाडे, देविदास पवार, बापुसाहेब होने यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते .