Pune news : पुणे : पुण्यातली शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाजवळ राहणार्या पती-पत्नीचे मृतदेह घरात आढळून आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
दरम्यान, पत्नीचा मृतदेह बेडवर आढळून आला आहे तर पतीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. (Pune news) हेमंत रामकृष्ण थोरात (64) आणि सुनिता हेमंत थोरात (58, दोघे रा. चिंचेची तालीम जवळ, सेवा मित्र मंडळ जवळ, शुक्रवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत.
कारण अद्याप अस्पष्ट
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनिता थोरात या गेल्या 3-4 वर्षापासून आजारी होत्या. रविवारी सकाळी याबाबत खडक पोलिसांना समजले असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. (Pune news) सुनिता हेमंत थोरात यांचा मृतदेह बेडवर होता तर हेमंत थोरात यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय अहवालानंतर सुनिता थोरात यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाले हे स्पष्ट होणार आहे. (Pune news) दरम्यान, सुनिता थोरात यांच्या अंगावर कुठेही जखमा नसल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी भल्या सकाळी शुक्रवार पेठेत अशा पध्दतीची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हेमंत थोरात यांच्या आत्महत्येचे कारण देखील अद्याप अस्पष्ट आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मावळात आर्थिक छळाला कंटाळून एकाची गळफास घेत आत्महत्या