Mumbai News : मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषद आमदार मनिषा कायंदे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच ठाकरे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी आयुष्यातली चार वर्षे वाया गेली म्हणत उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. शिंदे यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा मातोश्रीवर जाऊन सुपूर्द केला. उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर मुंबईत पार पडण्याच्या एक दिवस आधीच मनिषा कायंदे तसेच शिशिर शिंदे यांनी पक्ष सोडल्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
शिशिर शिंदे यांना राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये शिशिर शिंदेंचा समावेश होता. (Mumbai News) ते मनसेचे आमदार म्हणून निवडूनही आले होते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २०१८ मध्ये त्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली. मात्र आता त्यांनी आयुष्यातली चार वर्षे वाया गेली म्हणत उद्धव ठाकरेंचीही साथ सोडली आहे.
राजकीय आयुष्यातली चार वर्ष वाया गेली
दरम्यान, पदाचा राजीनामा देताना शिंदे यांनी म्हटलं आहे की, पक्षाचे काम करत असताना मला मनासारखं काम करायला मिळत नव्हतं. (Mumbai News ) याबाबत उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिली गेली नाही. त्यानंतर केवळ नावापुरत पद दिलं गेलं. त्यामुळे राजकीय आयुष्यातली चार वर्ष वाया गेली.
गेल्या सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय, पण भेट होत नाही. अनेक वेळा भेटीसाठी प्रयत्न केले, पण भेट झाली नाही. २०२२ पर्यंत माझ्यावर पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली नाही. (Mumbai News ) एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर म्हणजेच जून २०२२ मध्ये शिशिर शिंदे यांना उपनेता करण्यात आलं होते. मात्र, उद्धव ठाकरे भेटत नाहीत, तसंच आपल्याला आपल्या मनासारखे काम करू दिले जात नाही, म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : आशिष देशमुख यांचा भाजपात प्रवेश; विदर्भाच्या हितासाठी काम करणार!