Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अनोखी घटना घडली. यात बकरीने चारा खाल्ला म्हणून तिला ताब्यात घेऊन दिवसभर बांधून ठेवले. इतक्यावर हे थांबले नाहीतर सायंकाळी बकरीच्या मालकावर थेट गुन्हाच दाखल केला. न्यायालयानेही त्याला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. Chhatrapati Sambhajinagar
कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाडांचा पाला खाल्ल्यामुळे पोलिसांनी बकरीला ताब्यात घेतले होते. तिला दिवसभर बांधून ठेवले होते. त्यानंतर सायंकाळी बकरीचा मालक राउफ रज्जाक सय्यद याच्यावर गुन्हा दाखल केला. ही बकरी सय्यद यांची असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली(.छत्रपती संभाजीनगर )
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर सय्यद याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयाने त्याला दोन हजार रुपये दंड ठोठावला असल्याची माहिती सय्यद याने दिली. या अशा अनोख्या प्रकाराची सध्या एकच चर्चा सुरु आहे.(छत्रपती संभाजीनगर )
पोलिसांवर टीकेची झोड
एकीकडे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक अवैध धंदे सुरू आहेत. त्यावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाहीये. पण फक्त बकरीने चारा खाल्ला म्हणून केलेल्या कारवाईनंतर पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे.(छत्रपती संभाजीनगर )