राहुलकुमार अवचट : यवत
Ashadhi Wari 2023 : यवत, (पुणे) :
पहाटेचा मंद गारवा… भक्तीगीतांचा जागर…
‘तुकोबा तुकोबा’ असा नामघोष करीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री काळभैरवनाथ मंदिर यवत येथून पंढरपूर कडे मार्गस्थ झाला. यावेळी प्रवीण मसाला कंपनी पर्यंत चालत जाऊन यवतकरांनी पालखीला निरोप दिला. (Ashadhi Wari)
दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि सकाळनंतर पालखी मार्गावर हरिनामाचा अखंड जयघोष सुरू होता. आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू येथून पंढरपूरकडे निघाला आहे. गुरुवारी रात्री उशिरा पालखी सोहळा यवत मुक्कामी पोहोचला होता. दिंड्या व वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था शाळांमध्ये केली होती. मात्र, पाऊस नसल्याने अनेक वारकरी पुणे-सोलापुर महामार्गाच्या पदपथावरच रात्रभर मुक्कामी होते. पहाटे पाच वाजता पादुकांचा अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. या वेळी पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांचा सन्मान करण्यात आला. (Ashadhi Wari)
ज्ञानोबा-तकाराम गजर करत पालखी ज्ञानोबा-तुकाराम गजर करत पालखी खांद्यावर घेत गावातुन प्रदिक्षणा करुन जि. प. शाळेजवळ दर्शनासाठी ठेवण्यात आली प्रदक्षिणा मार्गावर विद्या विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. दर्शनानंतर पालखी रथात ठेवून सोहळा मार्गस्थ झाला. रस्त्याच्या दुतर्फा थांबून भाविकांनी दर्शन घेतले. ‘ज्ञानोबा तुकाराम’ जयघोष करत आणि ‘टाळ मृदंगाचा गजर’ सुरू होता. अनेकांनी ठिकठिकाणी चहा, नाश्त्याची सोय केली ‘टाळ मृदंगाचा गजर’ सुरू होता. अनेकांनी ठिकठिकाणी चहा, नाश्त्याची सोय केली होती. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पालखीने टाळ मृदूंगाच्या गजरात वरवंड कडे प्रस्थान केले. (Ashadhi Wari)
यावेळी उपसरपंच सुभाष यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश शेळके, ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे, ह.भ.प नानासाहेब दोरगे, माझी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, युवा नेते गणेश शेळके, श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश दोरगे,शंकर दोरगे, दत्तात्रय दोरगे, चंद्रकांत दोरगे, मयूर दोरगे, रोहन दोरगे, कैलास दोरगे, यांसह समस्त ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ashadhi Wari)
दरम्यान, प्रवीण मसाला यवत वेशीवर दौंड पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर दोरगे, माजी उपसभापती नितीन दोरगे, भांडगावचे सरपंच संतोष दोरगे, उपसरपंच सिंधू हरपळे, लक्ष्मण काटकर, रवींद्र दोरगे, विठ्ठल दोरगे यांनी पालखीचे स्वागत केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनेचे पदाधिकारी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ashadhi Wari)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..