दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या दर्जाहीन, निष्कृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना बुधवारी (ता.14) दिले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या.
या बैठकीमध्ये संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या दर्जाहीन कामाबरोबरच विविध विषयांवरही चर्चा केली. याभेटीमध्ये संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम निकषानुसार गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, (Indapur News) निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व मार्गाचे काम लवकर पूर्ण होणेसाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा यासंबंधीचे निवेदन हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री गडकरी यांना दिले.
निकृष्ट कामाबाबत जनतेच्या अनेक तक्रारी
पालखी मार्गाचे काम दर्जेदार झाले पाहिजे, अशी कडक भूमिका गडकरी यांची आहे. मंत्री गडकरी हे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत कधीही तडजोड करीत नाही. (Indapur News) मात्र पालखी मार्गाच्या निकृष्ट कामाबाबत जनतेच्या अनेक तक्रारी येत आहेत. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाची ना. गडकरी यांनी स्वतंत्रपणे दौरा काढून पाहणी करावी, शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम मिळणेसाठी वाद वादविवादाचे दावे लवकर निघाली काढण्यात यावेत अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी गडकरी या केली.
सदर कामाच्या ठिकाणी फलक व इतर रस्ता सुरक्षिततेच्या नियमांचे कंत्राटदारांकडून पालन केले जात नसल्याने सतत अपघात होऊन अनेकांना जीव गमावावे लागले आहेत. (Indapur News) पालखी मार्गाच्या अपूर्ण कामांमुळे जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे पालखी मार्गाची गुणवत्तापूर्ण अशी कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : इंदापूरच्या आमदारांनी विकासकामांचे श्रेय घेण्याची सवय बंद करावी; अँड. शरद जामदार
Indapur News : जिजाऊ फेडरेशनकडून कर्तृत्वान महिलांचा सन्मान
Indapur News : बलभीम काळे व बापूराव बंडगर यांच्या निधनाने समाजाचे नुकसान : हर्षवर्धन पाटील