Sangli News सांगली : पोलीस दलातून वाईट बातमी समोर आली आहे. सांगली पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Sangli News) सहकारी मित्राच्या घरी पार्टी करण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला आहे. (Sangli News) ते पार्टीनंतर शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. (Sangli News) पाण्यात दम लागल्याने ते पाण्यात बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. (Sangli News) या घटनेनंतर शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Sangli News)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव
तिम्बती आवळे असे मृत्यू झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते सांगली पोलीस मुख्यालयातील मोटार परिवहन विभागात कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसे येथे मंगळवारी सांगली होमगार्ड चालकांची परिक्षा होती. या परिक्षेसाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक तिम्बती आवळे आणि त्यांच्या सहकार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. होमगार्ड चालकांची परीक्षा झाल्यानंतर तिम्बती आवळे हे सहकारी विनायक कांबळे यांच्या घरी जेवणाच्या पार्टीसाठी गेले होते. पार्टीनंतर दोघेही शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. परंतु, पोहत असताना तिम्बती आवळे हे शेततळ्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्राला आवळे बुडाल्याचे लक्षात आल्यावर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवळे हे पाण्यात बुडाल्याने सापडले नाहीत. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले, त्यानंतर पाण्यामध्ये उतरून रेस्क्यू टीमकडून आवळे यांचा मृतदेह शोधून काढण्यात आला. पाण्यात दम लागल्याने ते बुडाले असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून सदर घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.