Satara News : कराड : साताऱ्यातील कराडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कराड तालुक्यात जेवणातून 23 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एकाचा मृत्यूहू झाला आहे. कराड तालुक्यातील वहागाव येथे हा प्रकार घडला आहे. 7 जणांवर सध्या कराडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
कराड तालुक्यातील वहागाव येथील घटना
तुकाराम विठ्ठल राऊत (वय 70, वहागाव ता,कराड ) असे विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पत्नी सुनंदा तुकाराम राऊत व सचिन वसंत सोनुलकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Satara News) दरम्यान, विषबाधा झाल्यानंतर अनेकांना जुलाब उलट्यांचा त्रास झाला. त्यापैकी 15 जणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वहागाव येथील तुकाराम विठ्ठल राऊत यांच्या नातेवाईकाची शुक्रवारी दोन जून रोजी देवाची यात्रा होती. यात्रेत मासांहारी जेवण होते.त्यानिमित्ताने त्यांनी येतगाव (ता. कडेगाव), गोळेश्वर, अभयनगर, विंग तसेच स्थानिक वहागावमधील ३५ पै- पाहुणे व नातेवाईकांना जेवणासाठी निमंत्रित केले होते. (Satara News) शुक्रवारी मांसाहारी जेवण झाल्यानंतर शनिवारपासून ३५ जणांपैकी तुकाराम राऊत यांच्या कुटुंबीयांसह २३ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. विषबाधा झालेल्या तेवीस जणांमध्ये वहागावमधील ११, येतगाव ४, गोळेश्वर २, अभयनगर ३ व विंग येथील ३ जणांचा समावेश आहे.
दरम्यान, उलट्या व जुलाबाचे प्रमाण वाढल्यामुळे तुकाराम राऊत, पत्नी सुनंदा तुकाराम राऊत आणि सचिन वसंत सोनुलकर यांना कराड येथे खाजगी रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण तसेच गटविकास अधिकारी मिनाताई साळुंखे यांनी वहागाव येथे भेट दिली.(Satara News) विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू करत तेथील जेवणाचे नमुने तपासणीसाठी घेतले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News : आनेवाडी नजिक विठाई बस पेटल्याने अनेक प्रश्नांचा निघाला धूर
Satara News : रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दलित अन्याय विरोधात जनआक्रोश आंदोलनाची तयारी
Satara News : नूतन सातारा जिल्हाधिकारी सतिश दुडी यांनी पदभार स्वीकारला…