Mumbai News : मुंबई : राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये काल (ता. १३) “राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे” अशा मथळ्याखाली शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. या जाहिरातीने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठले. भाजप-शिवसेना युतीत धुसफूस असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांना डावलल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आज (बुधवार, ता. १४) शिंदे गटाने नवी जाहिरात देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
त्यांना काहीच वाटत नाही
दरम्यान, या जाहिरातबाजीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. जाहिरातीविषयी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शिंदेंची (Mumbai News) आजची जाहिरात ही सरड्यासारखी आहे. हे सगळं सरड्याच्या रंगांसारखं आहे. त्यांना काहीच वाटत नाही. अख्खा महाराष्ट्र पहिल्या पानावरची जाहिरात वाचतो. आज एक जाहिरात येते, उद्या एक जाहिरात येते… म्हणजे यांची पॉलिटिकल क्रेडिबिलिटी (राजकीय विश्वासार्हता) शून्य झालीच आहे. परंतु बौद्धिक क्रेडिबिलिटी पण आज शून्य झाली आहे.
दरम्यान, मंगळवारी प्रसिद्ध केलेली जाहिरात शिंदे गटाने दिलीच नव्हती, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी व्यक्त केली. या प्रतिक्रियेमुळे या गोंधळात अजून भर पडली. शिवसेनेने जाहिरात दिली नाही, मग आजची जाहिरात कुणी दिली? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. आव्हाड म्हणाले,(Mumbai News) ही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. आज ना उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील, मला पंतप्रधानच व्हायचंय… अशा शब्दांत आव्हाड यांनी टीका केली.
दरम्यान, राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना दिलेल्या या जाहिरातीमुळे जनमाणसांत राज्य सरकारविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आज (बुधवार, ता. १४) शिंदे गटाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. (Mumbai News) राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना जाहिरात देऊन “जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा” अशा शीर्षकाने जाहिरात देत, उत्तरार्ध केला आहे. सलग दोन दिवसात शिंदे गटाच्या दोन जाहिराती प्रसिद्ध झाल्याने त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शिंदे सरकार पुढील दोन महिन्यांत पडणार; संजय राऊतांच्या नव्या दाव्यामुळे खळबळ