Health Tips : व्यायाम केल्याने शरीराला आणि मनाला आलेली मरगळ नाहीशी होते. मात्र रोज व्यायाम करण्याचा अनेकांना कंटाळा येतो. काहीतरी निमित्त काढून ते व्यायाम टाळतात. अशा लोकांसाठी एक सोपा पर्याय आहे तो म्हणजे सायकल चालवणे. सायकल चालवल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. बाजारात जाताना, शाळेत जाताना किंवा जवळच्या ठिकाणाला भेट देताना सायकल चालवा. व्यायामही होतो आणि शरीरही तंदुरूस्त राहील आणि विशेष म्हणजे पेट्रोल बचतही होईल. आपल्याकडे सायकल चालवण्याच्या व्यायामाचा हवा तितका प्रचार आणि प्रसार झालेला नाही. म्हणून तुम्ही बदल घडवायला स्वतःपासून सुरुवात करा. जाणून घ्या सायकल चालवण्याचे फायदे (Ride a cycle to keep your mood fresh, know the benefits of cycling)
अनेक आजारांपासून संरक्षण होते
कॅलरी बर्न होतात
सायकल चालवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात. सायकल चालवली तर शरीरात तासाला जवळपास 300 कॅलरी बर्न होतात.
अनेक आजारांपासून संरक्षण होते
सायकल चालवल्याने अनेक आजारांपासून आपल्या शरीराचं संरक्षण होतं. (Health Tips) हृदयाशी निगडीत आजार, मधुमेह अशा आजारांपासून संरक्षण होतं.
मूड फ्रेश राहतो
ज्या लोकांना तणाव, नैराश्य आले असेल अशा लोकांनी रोज सायकल चालवण्याचा आनंद घ्यावा. त्यामुळे यापासून मुक्ती मिळते. आपला मूड फ्रेश राहतो. दिवस आनंदात जातो.
शरीराचे स्नायू बळकट होतात
सायकल चालवणे हा शरीरासाठी फायदेशीर असा व्यायाम आहे. त्यामुळे शरीराचे स्नायू बळकट होतात. शरीर फिट ठेवण्यासाठीही सायकल चालवली पाहिजे.
वजन नियंत्रणात राहते
वजन कमी करायचं असेल तर सायकल चालवण्याचा व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. वजन नियंत्रणात राहते.
स्टॅमिना वाढतो
शरीराचा स्टॅमिना वाढवण्यासाठीही सायकलच्या व्यायामाचा फायदा होतो.
फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते
सायकल चालवणाऱ्या लोकांना निसर्गातील शुद्ध हवेचा पूरवठा होतो. (Health Tips) ज्यामुळे त्यांची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. शरीराला जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : फायबरयुक्त पदार्थ खाण्याचे फायदे
Health Tips : सकाळी उपाशी पोटी चहा पिणे आरोग्यास हानिकारक, जाणून घ्या कारणे
Health Tips : स्मरणशक्ती वाढविण्यासाठी पिस्ता गुणकारी, जाणून घ्या पिस्ता खाण्याचे इतर महत्वाचे फायदे