गणेश सुळ
Daund News : केडगाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून(एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा 2021 च्या परीक्षेत अनिकेत थोरात यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेतून त्यांची सहायक कामगार आयुक्त या वर्ग एकच्या पदावर निवड झाली आहे. त्यामुळे अनिकेत यांचे सर्वच स्तरातून कौतूक केले जात आहे. (Aniket Thorat’s success in the MPSC exam; Selection to the post of Class I)
वडीलांना जीवन गौरव पुरस्कार
एमपीएससीने या परीक्षेची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात केली आहे. महाराष्ट्र राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष जी. के. थोरात असे अनिकेत यांच्या वडिलांचे नाव आहे. निकेतच्या या यशबरोबरच त्यांच्या वडीलांना महाराष्ट्र राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष (Daund News )जी. के. थोरात यांना स्वर्गीय मा. आमदार शिवाजीराव पाटील जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशा एकाच कुटुंबात लागोपाठ दुहेरी यशामुळे संपूर्ण तालुक्यात या खुटबावच्या थोरात कुटुंबियांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
एवढ्याच यशावर समाधान न मानता भविष्यामध्ये आयएएस होण्याचा मानस अनिकेत थोरात यांनी बोलून दाखवला. या यशाबद्दल पुणे शहर सचिव (Daund News ) संतोष थोरात,प्राचार्य शिवाजीराव कामथे, प्राचार्य राज मुजावर, प्राचार्य शशिकांत शिंदे, सुनिल गिरमे, यांनी अनिकेत व जी. के. थोरात यांना शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व पेढा भरवून अभिनंदन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : राजा – पोपट संतराज महाराज पालखी रथाचे मानकरी
Daund News :चौफुला येथे पकडला ६३ हजार किंमतीचा गांजा; चार जणांना अटक, यवत पोलिसांची कारवाई