युनूस तांबोळी
Nature News शिरूर : उन्हाळ्याचा पारा चढू लागला की सुखद मनमोहक दिसणाऱ्या फुलांचा वर्षाव होतो. हा देखील निसर्गातिल चमत्कार आहे. (Nature News) अशा रखरखत्या उन्हात रस्त्यावरील विविध झाडे आकर्षणाचा विषय ठरत आहेत. (Nature News )त्यातून गुलमोहराच्या झाडांवरचा फुलोवर्षाव अधिकच मोहून टाकणारा दिसू लागला आहे. (Nature News)
गावागावात तसेच रस्त्याच्या कडेला सध्या गुलमोहरांच्या झाडांमुळे विशेष आकर्षणाचे केंद्र झाले असून या रस्त्यावर फुलांची पखरण झाली आहे. ग्रिष्म ऋुतूत वातावरणात थंडावा निर्णाण होत असतो. पण ऋतूचक्र उलटेच फिरत असून उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात आसे चित्र पहावयास मिळू लागले आहे. अशा वाढत्या तापमानात गुलमोहराच्या झाडाची सावली सोबत मनमोहक दिसणारी सुंदर फुले थंडावा देत आहेत.
उन्हाळा संपून जून महिना सुरू झाला तरी तापमानाचा पारा काही केल्या खाली येत नाही. त्यामुळे सर्वजण आता उन्हाळा संपण्याची वाट पहात आहेत. सध्या पुणे नगर, पुणे नाशिक, आळेफाटा नगर या महामार्गांवर रस्त्याच्या दुतर्फा असलेली गुलमोहराची झाडे मनमोहक स्वरूपात दिसू लागली आहेत.
मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर देखील वेगवेगळ्या फुलांनी बहरलेली झाडे प्रवाशांचे मनमोहून टाकत आहेत. त्यात गुलमोहराच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फुले लागली आहेत. लाल, केसरी, पांढऱ्या रंगाची उधळण केलेली पहावयास मिळत आहे. त्यातून काही ठिकाणी मान्सुनपुर्व पावसाच्या हजेरीने रस्त्यावर या फुलांचा सडा पडला आहे. तरीदेखील गुलमोहराच्या झाडांवर फुलांचा बहर दिसून येत असल्याचे चित्र आहे.
गुलमोहर अनुभूती वाटसुरूंची…
रस्त्याच्या कडेला असणारी गुलमोहराची दुतर्फा असणारी झाडे, शाळा, कॅालेजमध्ये असणारी गुलमोहराची झाडे मोठी झाली आहेत. सध्या या झाडांना मनमोहक दिसणारी सुंदर फुलांचा वर्षाव झालेला पहावयास मिळत आहे. या प्रत्येक मार्गावरून प्रवास करताना एक वेगळीच अनुभूती वाटसुरूंना मिळत आहे.
सुनील जाधव
(पर्यावरण प्रेमी नारायणगाव ता. जुन्नर)