युनुस तांबोळी
Shirur News : शिरूर : जमिनीच्या वाटपावरून झालेल्या वादातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रावडेवाडी (ता.शिरूर) येथे बुधवारी (ता.७) पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (A Son attacked his father with a coyota; A shocking incident at Ravdevadi in Shirur taluka)
शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील धक्कादायक घटना
याप्रकरणी शिरूर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर या हल्ल्यात लक्ष्मण तांबे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील केईम रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण तांबे यांना दोन पत्नी असून ते दुसऱ्या पत्नी सोबत भोसरी येथे राहतात. (Shirur News) तर लक्ष्मण तांबे यांच्या पहिल्या पत्नीचा अल्पवयीन मुलगा व त्यांच्यात जमिनीच्या वाटपावरून वाद होता.
या वादाच्या संदर्भात कोर्टाची तारीख उरकून वडील लक्ष्मण तांबे हे बुधवारी (ता.७) दुपारी चार वाजता मलठण येथे जात होते. तेव्हा अल्पवयीन मुलाने वडील लक्ष्मण तांबे यांना नानीचा मळा येथे रस्त्यावर अडविले. (Shirur News) आणि वडिलांवर कोयत्याच्या सहाय्याने जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात वडील गंभीर जख्मी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी केईम रूग्णालय पुणे येथे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले, सहाय्यक फौजदार माणिक मांडगे, पोलिस कर्मचारी विशाल पालवे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Shirur News) पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : बिबट्याने हल्ला चढविल्याने दोन तरूण जखमी
Shirur News : वाढत्या उन्हात आरोग्याची काळजी घ्या; डॅाक्टरांचा नागरिकांना सल्ला
Shirur News : शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गजबज वाढली