Junnar News : जुन्नर : शिक्षण, नोकरी, शेतकरी तसेच पैसापाणी असला तरी आजकाल मुलांची लग्न होणे कठीण होऊन बसले आहे. याचा फायदा घेत ज्या मुलांचे वेळेवर लग्न होत नाही, अशी मुले शोधून त्यांना मुलगी देतो असे सांगून बनावट लग्न लावून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहा जणांच्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Police handcuffed a gang that extorts money by arranging fake marriages; The incident of cheating 20 to 22 youths was revealed…)
तुकाराम भाऊराव मांगते (वय २३, रा. इगतपुरी घोटी, जि. नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय ४६, रा. बोटा, ता. संगमनेर), शिवाजी शंकर कुरकुटे (वय ६४, रा. कुरकुटेवाडी, बोटा), बाळू गुलाब सर्वडे (वय ४१, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर) या चार जणांसह जयश्री काळू घोटाळे (वय ३५, रा. मुरंबी शिरजगाव, जि. नाशिक) आणि मीरा बन्सी विसलकर (वय ३९, रा. इगतपुरी घोटी, जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Junnar News)
२० ते २२ तरुणांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस…
आरोपींनी २० ते २२ तरुणांची बनावट लग्ने लावून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी एकाच महिलेने दोन तरुणांचे लग्न लावून; तसेच त्यांची आर्थिक फसवणूक करून नवरी पळून गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यावरून संबंधित महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. (Junnar News) या महिलेकडून आणखी काही जणांची फसवणूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या प्रकरणाचा तपास केला असता सर्व आरोपी सापडले. त्यांनी २० ते २२ जणांची बनावट लग्ने लावून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
बनावट लग्न लावून ज्या तरुणांची फसवणूक करण्यात आली असेल, त्यांनी पुढे यावे आणि पोलिसांना माहिती द्यावी. ज्या मुलांची लग्ने ठरत नाहीत,अशा मुलांनी तसेच नातेवाईकांनी ज्या मुलीशी लग्न ठरेल तीच्या नातेवाईकांची माहीती घ्यावी ,यातून फसवणूक होणार नाही यासाठी सावधानता बाळगावी. (Junnar News)
असे आवाहन जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : आश्रमशाळेतील पाण्याच्या टँकरचे बिल मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकाने मागितली लाच
Junnar News | पुणे : तरुणावर बिबट्याने अचानक केला हल्ला आणि मग…