हनुमंत चिकणे
Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : भवरापूर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जानकू दत्तात्रय सातव यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच संगीता रमेश गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हि निवडणूक घेण्यात आली. (Janku satv unopposed as deputy sarpanch of Bhavrapur Gram Panchayat.)
भवरापूरचे सरपंच सचिन सातव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. ०६) ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. (Uruli Kanchan News) यावेळी उपसरपंच पदासाठी जानकू सातव यांचा एकमेव अर्ज आल्याने भवरापूरचे सरपंच सचिन सातव यांनी जानकू सातव यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. ग्रामसेवक भारती ताम्हाणे यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले.
यावेळी माजी सरपंच बबनराव साठे, माजी उपसरपंच संगीता गायकवाड, शकुंतला टिळेकर, गणेश सातव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन साठे, रमेश गायकवाड, विकास साठे, रवींद्र साठे, संदीप साठे, दत्तात्रय सातव, सारिका साठे, महेश गायकवाड, संतोष सातव, (Uruli Kanchan News) लखन गायकवाड, मुरलीधर साठे, हनुमंत गायकवाड, शंकर सातव, सुभाष सातव, अरुण चांदोरे, तानाजी सातव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गावच्या सर्वांगिण विकासासाठी काम करण्याची ग्वाही
दरम्यान, गावच्या सर्वागिण विकास कामासाठी सरपंच – ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जण प्रयत्न करु तसेच येणाऱ्या भविष्यकाळात मला मिळालेल्या पदाचा विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नवनिर्वाचित उपसरपंच जानकू सातव यांनी केले.(Uruli Kanchan News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Uruli Kanchan News : कोरेगाव मूळ येथील अमर एज्युकेशन इनस्टीटयूटचे विद्यार्थी शंभर नंबरी..