जनार्दन दांडगे
Pune News : पुणे : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी तातडीने व विनासायास मिळावी या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 8650567567 हा मोबाईल क्रमांक सुरु केला आहे. ववैधकिय मदत हवी असणाऱ्या गरजुंनी 8640467567 या मोबाइल क्रमांकावर केवळ मिसकॉलचा दिल्यास, संबधितांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आता सहज, सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत निधी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे. (Just give a miss call on mobile number “8650567567” for medical help…From the Chief Minister’s Assistance Fund, funds will be available for the treatment of various surgeries, diseases in an easy, simple manner and in a short time.)
गरजू रुग्णांना मिळणार कमी वेळेत मदत
वैधकिय मदतीसाठी ग्रामीण भागातील गरजूंना मंत्रालयाचे दरवाजे झिजवावे लागतात. अनेकदा अर्ज भरताना चुका झाल्यास नव्याने प्रक्रिया करावी लागते. (Pune News) उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी परवड लक्षात घेऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने लाभार्थीना एका मिसकॉलवर वैधकिय मदतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून दिली असल्याचेही मंगेश चिवटे यांनी सांगीतले.
याबाबत अधिक माहीती देतांना मंगेश चिवटे म्हणाले, हृदयविकार, गुडघे व खुब्यांचे प्रत्यारोपण, अपघात, डायलिसिस, किडनी विकारावरील उपचाराबरोबरच, भाजलेल्या, विजेचा धक्का बसलेल्या रुग्णांकडूनदेखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे अर्ज येत आहेत. (Pune News) यातील बहुतांश अर्ज अपूर्ण असल्याने, मुख्यमंत्री कार्यालयाला मदत करण्याची इच्छा असुनही, गरजुना मदत मिळण्यात अडचणी येत असल्याचे दिसुन आले आहे. यामुळेच शासनाने वरील नंबर जाहीर केला आहे. वरील नंबर वर सध्या केवळ मिसकॉलवर ही सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी पुढील कांही दिवसात मदतीसाठी ऍप बनवले जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल. एकाच वेळी सर्व अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना मदत कक्षाशी संपर्क साधावा लागणार नाही.
मोबाईल नंबर दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल बोलतांना मंगेश चिवटे म्हणाले, वैधकिय मदत हवी असणाऱ्यांनी मोबाइल क्रमांकावर मिसकॉल केल्यानंतर, संबधिताला मिस कॉलदिलेल्या मोबाईलनंबरवरच अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मिळेल. (Pune News) त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड होणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून तो भरावा. रुग्णाच्या आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष किंवा स्कॅन पीडीएफमध्ये cmrf.maharashtra.gov.in या ई – मेल आयडीवर अपलोड करवी लागणार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवण्यासाठी आता फक्त मिसकॉल देण्याची आवश्कता आहे. या निधीतून मागील वर्षांत हजारो गरजूंना मदत दिल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले.
अशी असेल प्रक्रिया
अर्जदाराने ८६५०५६७५६७ या मोबाईल क्रमांकावर मिसकॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे प्राप्त होईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड होणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून तो भरावा. रुग्णाच्या आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष किंवा स्कॅन करून पीडीएफमध्ये cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर अपलोड करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी ८ जूनपासून नोंदणी..!