Hadapsar News : हडपसर, (पुणे) : हडपसर टर्मिनसचे काम सुरू करण्यात आले असून काही इमारती पाडण्यात आल्या आहेत. सध्या, स्थानकासमोरील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या जुन्या इमारती पाडण्यात येत असून लवकरच “आरपीएफ’ची चौकीही पाडण्यात येणार आहे. (Demolition of old buildings in front of Hadapsar railway station started; Expansion of railway terminus starts fast..)
हडपसर रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराचे काम सुरू
हडपसर टर्मिनस लगतची काही जागा रेल्वे प्रशासन ताब्यात घेत आहे तसेच स्वतः मालकीच्या जागेवरील कार्यालयीन इमारती पाडून त्या जागी मोठा रस्ता तसेच पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. (Hadapsar News) मध्य रेल्वेकडून हडपसर रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता असल्याने टर्मिनस लगतची काही जागा रेल्वे प्रशासन ताब्यात घेत आहे.
रेल्वे बोर्डकडून हडपसर टर्मिनसच्या विकासासाठी १३५ कोटी रुपयांचा निधी पुणे विभागाला उपलब्ध झाला आहे. यानुसार रेल्वे प्रशासनाने हडपसर टर्मिनसची विकासकामे सुरू केली आहेत. परंतु, टर्मिनसच्या बाहेरील रस्ता अरुंद आहे, (Hadapsar News) त्यामुळे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शिवाय प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांना पार्किंगसाठी जागा नसल्याने ती रस्त्यावर लावली जात असल्याकारणाने या परिसरात सर्वत्र अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने तसेच यातून होणारी गर्दी असे चित्र असते. त्यामुळे रेल्वेच्या जागेवरील इमारती पाडून त्या ठिकाणी रस्ता तसेच वाहनतळ उभारण्यात येणार आहे.
ट्रेन कधी सुरू होणार?
हडपसर टर्मिनसचे काम वारंवार लांबणीवर पडत आहे. त्यामुळे येथून ट्रेन कधी सुरू होणार? याचे उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांकडे आजही उपलब्ध नाही. (Hadapsar News) मधल्या काळात येथून नांदेड, हैदराबाद अशा ट्रेन सुरू करण्यात आल्या. पण, सुविधांअभावी प्रवाशांची हेळसांड सुरूच होती. शिवाय, स्टेशनपर्यंत जाण्यासाठी पुरेशी वाहन व्यवस्थाही नव्हती. अशावेळी रिक्षाचालक अवाजवी भाडे आकारायचे. हे पाहता, येथून धावणारी नांदेड एक्स्प्रेस पुन्हा पुणे स्टेशन येथून सुरू करण्यात आली आणि हडपसर टर्मिनस अजूनही कागदोपत्री आणि निधीच्या गर्तेत अडकल्याचे चित्र आहे.
पुणे विभागाच्या रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे म्हणाल्या, “पुणे स्टेशनच्या यार्ड रिमॉडेलिंग वेळी काही गाड्या हडुपसर येथून सोडण्यात येणार आहेत. (Hadapsar News) त्यामुळे टर्मिनसच्या बाहेरचे काम होणे अपेक्षित होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने टर्मिनसच्या बाहेरील रेल्वे कर्मचाऱ्यांची क्वॉटर्स पाडण्यास सुरवात केली आहे.”