दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : इंदापूर तालुक्यात विविध विकास कामांचे उद्घाटन सोमवारी (ता.५) करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल हे इंदापूर दौऱ्यावर येणार आहेत. अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. (Union Minister of State Pralhad Singh Patel’s visit to Indapur on Monday – Former Minister Harsh Vardhan PatilTheir information)
लघु उद्योजक, व्यापारी यांच्या मेळाव्याचे आयोजन
प्रल्हाद सिंग पटेल यांच्या उपस्थितीत जंक्शन येथे सोमवारी (ता.५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लघु उद्योजक, व्यापारी यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Indapur News ) भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व भाजपचे हिमाचल प्रदेशचे सहप्रभारी रवींद्र टंडन हेही या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमानंतर तानाजी थोरात यांची मानकरवाडी येथील निवासस्थानी प्रल्हाद सिंह पटेल यांच्या समवेत दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बैठक होणार आहे. (Indapur News ) त्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास प्रल्हाद सिंग पटेल यांच्या हस्ते प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी घोलपवाडी येथे इंदापूर तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी यांचेसमवेत केंद्र व राज्य सरकारचे जल मिशनचे अधिकारी, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे अधिकारी आदींची बैठक होणार आहे.
दरम्यान, प्रल्हाद सिंग पटेल हेच या खात्याचे मंत्री आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये १३३५ कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकारने हरघर हरजल योजनेसाठी दिला आहे. (Indapur News ) सदर योजनांमधील त्रुटी व अडचणी संदर्भात बैठकीत चर्चा होईल. इंदापूर तालुक्यामध्ये जल जीवन मिशनची कामे दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी सदर बैठक महत्वाचे असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : इंदापूरच्या फुले माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल ७६.९२ टक्के
Indapur News : ‘ती’ जागा इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्टची – मेघ:शाम पाटील