Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९४.५२ टक्के लागल्याची माहिती मुख्याध्यापक जाधव एम. डी. यांनी दिली.(Result of Purogami Madhyamik Vidyalaya at Sortapwadi is 94.52 percent; Dnyaneshwari Khedekar first and Samarth Kokiel second..!)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (ता. ०२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. (Uruli Kanchan ) विद्यालयातील १४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १३८ विद्यार्थी पास झाले आहेत.
ज्ञानेश्वरी खेडेकर प्रथम तर समर्थ कोकीळ दुसरा..!
विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी
प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी मच्छिंद्र खेडेकर ८४.२० टक्के, द्वितीय समर्थ सुहास कोकीळ ८३.४० टक्के, तृतीय अनुष्का जिजाबा चौधरी ८२.२० टक्के, चतुर्थ प्रेरणा पाईकराव खोब्राजी ८१.४० टक्के, व अस्मिता अरूण मोरे ८०.८० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. (Uruli Kanchan) विशेष प्राविण्य श्रेणी १५ विद्यार्थी, प्रथम श्रेणी ५५ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी ५१ विद्यार्थी, तृतीय श्रेणीने १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले
दरम्यान, सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे (Uruli Kanchan ) व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ चोरघे, सचिव रंगनाथ कड, उपाध्यक्ष रामदास चौधरी व संस्थेतील सर्व विश्वस्तांनी व मुख्याध्यापक जाधव एम.डी. मुख्याधपक पडवळ एस.पी., पर्यवेक्षक श्री. आडकर बी.जे. यांनी अभिनंदन केले.